शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांकडे तीन कोटींचा मालमत्ता कर थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:25 IST

स्वतंत्र पथकांची निर्मिती : प्रत्येक कार्यालयाला बजावली नोटिस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मार्च महिन्याला सुरुवात होताच कर वसुलीची लगबग नगर परिषदेत वाढली आहे. मात्र शासकीय कार्यालयांकडेच सर्वाधिक थकबाकी असल्याचे दिसून येत आहे. सुमारे २ कोटी ८० लाख ८७ हजार रूपयांचा मालमत्ता कर शासकीय कार्यालयांकडे थकला आहे.

जी शासकीय कार्यालये नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीत येतात त्यांच्याकडून मालमत्ता कर वसूल करण्याचे अधिकार नगर परिषदेला प्राप्त होतात. नगर परिषदेचा काही खर्च हा मालमत्ता करातूनच भागवावा लागतो. त्यामुळे कर वसुलीकडे नगर परिषद प्रशासन विशेष लक्ष असते. ३१ मार्चपूर्वी किमान ९० टक्के वसुली व्हावी, यासाठी नगर परिषद प्रशासन कामाला लागले असते. ज्या नागरिकांकडे कर थकले आहे, अशा नागरिकांच्या घरी नगर परिषदेचे पथक थेट वसुलीसाठी संबंधित व्यक्तीच्या घरी जात असते. नगर परिषदेने स्वतंत्र पथक तयार केले असून प्रत्येकाकडे वॉर्ड नेमून दिला आहे. त्यांनी तिथून वसुली आणणे आवश्यक आहे. मार्च महिना लागल्यापासून कर वसूलीची गतीसुद्धा वाढली आहे. मात्र खासगी व्यक्तींच्या तुलनेत शासकीय कार्यालयांकडे सर्वाधिक कर थकीत असल्याचे दिसून येत आहे. कर वसुलीसाठी नगर परिषदेचे प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

सामाजिक भवनाकडे सर्वाधिक कर थकीतसामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या इमारतींचा सर्वाधिक कर थकला आहे. या कार्यालयाकडे सुमारे १ कोटी २६ लाख ७५ हजार रूपयांचा मालमत्ता कर थकला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पत्रशासकीय कार्यालयांनी मालमत्ता कराचा भरणा करावा तसे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे, यासाठी नगर परिषदेने पत्र दिले आहे.

५७% मालमत्ता कर वसुली गडचिरोली नगर परिषदेच्या एकूण मालमत्ता कराची मागणी ९ कोटी ७८ लाख रूपये एवढी आहे. त्यापैकी १७मार्चपर्यंत ५ कोटी ६२ लाख रूपये वसूल करण्यात आले आहेत. वसुलीचे प्रमाण सुमारे ५७ टक्के एवढे आहे. ३१ मार्चपूर्वी २० टक्क्यांपर्यंत कराची वसुली होईल, यासाठी नगर परिषद प्रशासन कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. सकाळीच घर गाठले जात आहे.

या कार्यालयांकडे सर्वाधिक मालमत्ता कराची थकबाकी

  • जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे २२ लाख ४० हजार रूपयांचा कर थकला आहे. चालू मागणी १२ लाख ४२ हजार रूपये एवढी आहे.
  • महिला रुग्णालयाकडे २४ लाख ३ ३० हजार रूपये, जिल्हा स्टेडियमकडे ५ लाख ५८ हजार रूपयांचा कर थकला आहे.
  • जिल्हा परिषदेकडे २ लाख ५६ 3 हजार, पोलिस स्टेशन गडचिरोलीकडे १२ लाख ५८ हजार, कृषी महाविद्यालयाकडे ४ लाख ३६ हजार, आयटीआयकडे २१ लाख ४९ हजार, पीडब्ल्यूडीकडे ११ लाख ९३ हजार रूपयांचा कर थकला आहे.

"नागरिकांना चांगली सेवा मिळण्यासाठी नागरिकांनी कर भरणे आवश्यक आहे. नगर परिषदेचे पथक कर वसुलीसाठी प्रयत्न करीत आहे."- स्वप्निल घोसे, कर अधीक्षक, नगर परिषद

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTaxकर