शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कामांचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:23 IST

आरमोरी शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नगर पंचायतीला प्राप्त होणारा विविध स्वरूपाचा निधी आरमोरी शहरातील विकास कामांमध्ये खर्च करावा,

ठळक मुद्देमुख्याधिकाºयांना निवेदन : आरमोरीत भाजप कार्यकर्त्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नगर पंचायतीला प्राप्त होणारा विविध स्वरूपाचा निधी आरमोरी शहरातील विकास कामांमध्ये खर्च करावा, याकरिता योग्य नियोजन व विनियोग करताना शहराचा समतोल विकास व्हावा या दृष्टीकोनातून संपूर्ण वॉर्डात प्रशासनाने वॉर्डसभा घ्यावी, वॉर्डसभेतील नागरिकांकडून वॉर्डातील प्रमुख व मूलभूत समस्या जाणून त्यानुसार शहर विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शहर शाखेच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांकडे गुरूवारी करण्यात आली.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरीतील पाणीपुरवठा फार जुनी असल्याने ती बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी, नगर पंचायतद्वारे एलईडीची व्यवस्था करण्यात आली. परंतु योग्य प्रकारे प्रकाश पडत नसल्याने दुसºया बाजूला अंधारच असतो. याकरिता प्रत्येक खांबावर दोन एलईडी गरज पडल्यास तीन एलईडी लावावे, विशिष्ट चौकांमध्ये हॉयमास्ट लावावे, प्रत्येक प्रमुख चौकात याची व्यवस्था करावी, नाली उपसा केल्यानंतर त्यातून निघालेल्या गाळाची विल्हेवाट लावावी, शहरातील प्रत्येक चौकात मूत्रिघर व सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करावी, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकाम योजनेंतर्गत गरजूंना लाभ द्यावा, अनेक लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ मिळाला नाही याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदन देताना भारत बावनथडे, सुनील नंदनवार, प्रदीप हजारे, प्रमोद संगमवार, महादेव राऊत, चांगदेव काळबांधे, राजू जराते, प्रमोद पेंदाम, भोलानाथ मेश्राम, विश्वनाथ कुकुडकर, प्रणव गजापुरे, कुंदा मेश्राम, शर्मिला मसराम, रेखा कुकडकर, अनिल नन्नावरे, पुंडलिक दहीकर, अमित जौंजाळकर, पिंकू बोडे, रामदास ढोक, कृष्णा कांबळे, भाष्कर खोब्रागडे, सुरेश वागघरे, डोमा मंगरे, दीपक खोब्रागडे हजर होते.