शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

भाकरोंडी भागात सट्टा जुगार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:58 IST

आरमोरी तालुक्याच्या टोकावर असलेले आणि मालेवाडा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या भाकरोंडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सट्टापट्टी जुगार व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सट्ट्यांचे आकडे लावण्यात पुरूष महिलांसह विद्यार्थीही गुंतले आहेत. या अवैध धंद्यामुळे भावी पिढी बरबाद होत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे मालेवाडा पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : आकड्यात गुंतले पुरूष, महिलांसह विद्यार्थी; लाखो रूपयांची होताहे उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या टोकावर असलेले आणि मालेवाडा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या भाकरोंडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सट्टापट्टी जुगार व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सट्ट्यांचे आकडे लावण्यात पुरूष महिलांसह विद्यार्थीही गुंतले आहेत. या अवैध धंद्यामुळे भावी पिढी बरबाद होत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे मालेवाडा पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.कुरखेडा येथील एक सट्टा व्यावसायीकाने भाकरोंडी, देवखडकी, बांदोना, बाजीराव टोला, भांसी, खांबाडा, मुस्का, पिसेवडधा आदी गावासह खेडेगावात आपले एजन्ट नेमले आहे. सायंकाळ झाली की नेमलेले हे एजन्ट लोकांकडून सट्ट्याचे नंबर घेऊन रात्री उशिरापर्यंत भ्रमणध्वनीद्वारा आपल्या मुख्य एजन्टला सट्ट्याचे नंबर कळवितात. शनिवारी व रविवारी सट्टापट्टी एजन्टचा हजारो रूपयांचा व्यवसाय होतो. या दोन्ही दिवशी सुट्टी राहत असल्याने सट्ट्याचे आकडे लावणाºयाचे प्रमाण अधिक असते. विकासापासून कोसो दूर असलेल्या भागात आर्थिक मिळकतीचे कोणतेही साधन नाही. शेती व्यवसाय व शासकीय कामातून झालेली आर्थिक मिळकत या सट्टा व्यावसायिकांच्या घशात जाते, अशी प्रतिक्रिया एका वयोवृद्ध नागरिकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.सट्ट्याचे नंबर घेणारे हे लोक गावातील पानठेला, किराणा दुकान तसेच चौकातील मुख्य जागेवर सट्ट्याचे नंबर घेत असतात. पुरूष मंडळी दिवसभर सट्ट्याचे नंबर लावण्यास गुंतलेले असतात. सट्टापट्टी घेणारे एजन्ट घरापर्यंत पोहोचून महिला व विद्यार्थ्यांकडून नंबर घेतात. गावाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी सदर परिसरात तंटामुक्त समितीमार्फत दारूबंदी करण्यात आली. मात्र दुसरीकडे सट्टा जुगारामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.तंटामुक्त समित्या बसल्या गप्पगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री, सट्टापट्टी जुगार व इतर अवैध धंदे सुरू आहेत. गावातील हे अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी तंटामुक्त समितीच्या पदाधिकारी, सदस्यांसह गावातील सरपंच, पोलीस पाटील यांची आहे. मात्र हे सारे प्रतिनिधी अवैध धंद्याबाबत एक शब्दही काढताना दिसून येत नाही. त्यामुळे गावातील अवैध धंद्याला या साºया लोकांची मुकसंमती आहे, असे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. स्वत:च्या गावाचा कारभार कसा सुरळीत चालावा, यासाठी तंमुस पदाधिकारी, ग्रा.पं. पदाधिकारी, पोलीस पाटील प्रयत्न करू शकतात. मात्र या सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारूविक्री व सट्टा जुगार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पोलीसही बघ्याची भूमिका घेत आहे.