शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

गडचिरोलीत स्ट्रॉबेरीच्या शेतीला चालना द्या; पालकमंत्र्यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:29 AM

Gadchiroli news गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी, अशी सूचना नगर विकासमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर‍ विभागीय बैठक झाली.

 जांभूळ - मोहफुलावर प्रक्रिया उद्योगही हवा

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आपण स्वत: सहा शेतकऱ्यांना महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे उपलब्ध करून दिली होती. त्याची लागवड यशस्वी होऊन शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी, अशी सूचना नगर विकासमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर‍ विभागीय बैठक झाली. त्यात ना. शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी होऊन गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी विविध मुद्दे मांडले.

गडचिरोलीला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी, यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन करावे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेचे बळ देतानाच ती कमी खर्चाची आणि उत्पादन वाढविणारी असावी, यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजार संशोधन करावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

कोरची तालुक्यात जांभळाचे वन आहे. येथील जांभळांना संपूर्ण राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असून, संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जांभळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रक्रिया उद्योगदेखील सुरू करावा, अशी अपेक्षा ना. शिंदे यांनी व्यक्त केली.

दक्षिणेकडील तालुक्यांना तेलंगणातून खत पुरवठा व्हावा

गडचिरोली जिल्ह्याला खतांचे वितरण चंद्रपूर येथून केले जाते. सिरोंचा तालुका हा सुमारे ३५० किमी अंतरावर आहे. अशावेळी या तालुक्याला खतांचा पुरवठा लगतच्या तेलंगणा येथून करण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून वेळेची बचत होतानाच वाहतूक खर्चही कमी होईल, असे पालकमंत्र्यांनी सूचविले.

मोहफुलांचा वापर पोषक आहारासाठी करावा

गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांची मोठी आर्थिक उलाढाल होते. सुमारे ३ लाख मजूर मोहफूल गोळा करण्याचे काम करतात. त्याद्वारे १४०० कोटी रुपयांची उलाढाल होते. अशा या मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करताना त्यातील औषधी आणि पोषण मूल्ये यासंदर्भात झालेले संशोधन लक्षात घेऊन या फुलांचा वापर पोषक आहारासाठी करण्यासाठी प्रयत्न करावेत. याठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.

धान साठवणुकीसाठी गोदामांची संख्या वाढवावी

जिल्ह्यात धान साठविण्यासाठी गोदामांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. हा विषय कृषी संलग्न असल्याने गडचिरोली जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढविण्यात यावी, जेणेकरून धानाची साठवण क्षमतादेखील वाढविता येणे शक्य होईल. गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाची २७९ पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्याची मागणीही पालकमंत्री शिंदे यांनी कृषिमंत्री भुसे यांच्याकडे केली.

टॅग्स :agricultureशेती