शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : एक हजारपेक्षा अधिक एकरातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर उभारलेल्या मेडीगट्टा प्रकल्पाच्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्याच्या एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारकडे आपण ही सर्व वस्तूस्थिती मांडून प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.खासदार नेते यांनी मंगळवारी (दि.२५) मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी दामोधर अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मधुसुदन अरवेली आदी उपस्थित होते.मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात मांडणार आहे. तसेच बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही खासदार नेते यांनी दिली.पंतप्रधानांकडे तक्रार करणारमेडीगड्डा सिंचन प्रकल्पाबाबत तेलंगणा सरकारने तत्कालीन महाराष्ट्र सरकारसोबत करार केला. मात्र करारानुसार तेलंगणा सरकारने प्रकल्पाचे काम केले नाही. करारादरम्यान ठरविण्यात आलेल्या बाबींची पूर्तता तेलंगणा सरकारने केली नाही. त्यामुळे तेलंगणा सरकारकडून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाली आहे, असा आरोप खा. नेते यांनी केला. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, असेही त्यांनी बाधीत शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

टॅग्स :FarmerशेतकरीAshok Neteअशोक नेते