शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

राज्यमंत्र्यांनी जाणल्या आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या समस्या

By admin | Updated: December 15, 2014 22:56 IST

शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने ११ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणस्थळाला आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट

गडचिरोली : शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने ११ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणस्थळाला आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. व प्रशासनाला सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तरीही समस्या मार्गी न लागल्याने आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे. जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांच्या मागील वर्षीच्या बदल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ करण्यात आला. २२० शिक्षकांच्या नियमबाह्यपणे बदल्या करण्यात आल्या. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र १० महिन्यांचा कालावधी लोटूनही एकाही दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालविला जात आहे. या नियमबाह्य बदल्यांमुळे ४ हजार ५०० शिक्षकांवर अन्याय झाला आहे. अतिरिक्त होण्याच्या भीतीने स्वत:ची बदली करवून घेतली आहे. या विरोधात शिक्षक परिषद संघटनेने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. उपोषण स्थळाला आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी भेट घेऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.सदर समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांनी दिले. मात्र दोन दिवस लोटूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे सदर आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे. १४ डिसेंबर रोजी आमदार प्रा. अनिल सोले यांनीसुद्धा भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे. मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा शिक्षक परिषदेचे विभागीय सहकार्यवाहक सत्यम चकीनारप, विभागीय उपाध्यक्ष नत्थुजी पाटील, रसीक बुद्धे, जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, यशवंत शेंडे, खांडेकर यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)