कुरखेडा : आमदार क्रिष्णा गजबे यांनी स्थानिक उपजिल्हा रूगणालयाला शनिवारी भेट देऊन रूग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांच्यासोबत चर्चा केली. कुरखेडा, कोरची व देसाईगंज तालुक्याचा काही भागातील नागरिक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात येतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी उपजिल्हा रूग्णालयाचे विशेष महत्त्व आहे. आमदार क्रिष्णा गजबे यांनी भेटीदरम्यान रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोयाम यांच्यासोबत रूग्णालयाच्या समस्यांबाबत चर्चा केली. रूग्णांसाठी आवश्यक असलेले साहित्य व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. भेटीदरम्यान रूग्णालयातील मनमोकळेपणाने रूग्णांसोबतही चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास गावडे, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, पं.स. सदस्य चांगदेव फाये, जलालभाई सय्यद, दिगांबर मानकर, सागर नाकाडे, भास्कर शेंद्रे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आमदारांनी जाणल्या कुरखेडा रूग्णालयाच्या समस्या
By admin | Updated: May 11, 2015 01:28 IST