आष्टी : १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्यात येत आहे. जिल्ह्यातही रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. या निमित्ताने साई कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे आष्टी ते चामोर्शी दरम्यानच्या शाळेतील मुलांसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह यावर ३ फेब्रुवारीला चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १३६ मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना उमरी येथे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय महामार्ग गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, उपविभागीय अभियंता आशिष आवळे, एल.एन.मालविया, अशोककुमार उपाध्याय, कार्यकारी अभियंता बोबडे, राजेश बियाणी उपस्थित हाेते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तन्वी सोनटक्के, द्वितीय क्रमांक अमृता सामरे, तृतीय क्रमांक जागृती सरबर, चतुर्थ क्रमांक प्रांजल कवडे, पाचवा क्रमांक करण कोवे याने पटकाविला.
चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST