शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मुख्याध्यापक, लिपीक शिक्षकांचे दौरे झाले बंद

By admin | Updated: October 16, 2014 23:23 IST

विविध कार्यालयीन कामासाठी गडचिरोली प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, लिपीक व शिक्षक नेहमी गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला येत होते. यामुळे आश्रमशाळांच्या प्रशासकीय

नवीन टपाल सेवा कार्यान्वित : प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढले परिपत्रकदिलीप दहेलकर - गडचिरोलीविविध कार्यालयीन कामासाठी गडचिरोली प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, लिपीक व शिक्षक नेहमी गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला येत होते. यामुळे आश्रमशाळांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामात व्यत्यय येत होता. सदर बाब निर्दशनास आल्यामुळे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी ४ आॅक्टोबर २०१४ रोजी नवे परिपत्रक काढून टपाल सेवा कार्यान्वित केली आहे. या सेवेअंतर्गत आश्रमशाळा परिसरातील ८ केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा नवा उपक्रम हाती घेतल्यामुळे आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, लिपीक तसेच शिक्षक आणि वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे दौरे बंद झाले आहेत. या टपाल सेवेमुळे पैसा व वेळेची बचतही झाली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या ४ आॅक्टोबरच्या परिपत्रकात टपाल सेवेची संपूर्ण माहिती आहे. गडचिरोली प्रकल्पाच्या अधिनस्त सर्व कार्यालयाने निश्चित केलेल्या विवरण पत्रानुसार नेमलेल्या शाळा, वसतीगृहाजवळचे मुख्य ठिकाणाहून अधिनस्त शाळा तसेच वसतीगृहाने प्रकल्प कार्यालयास पाठवावयाचे ठपाल केंद्रवर्ती ठिकाणच्या शाळा तसेच वसतीगृहांकडे दर बुधवारला टपाल पोच करून त्यांच्या मार्फतीने टपाल प्रकल्प कार्यालयास पाठवावे. तसेच मुख्य ठिकाण नेमलेल्या शाळा तसेच वसतीगृहांच्या अधिनस्त कार्यालयाची प्राप्त सर्व टपाल प्रकल्प कार्यालयास पोच करण्याकरीता व अंतर्गत कार्यालयाचे प्रकल्प कार्यालय स्तरावरील टपाल स्वीकारावी, असेही या परिपत्रकात नमुद आहे. बुधवारला सुट्टी असल्यास सदर टपाल व्यवस्थेचे काम गुरूवारला करावे, असेही या परिपत्रकात नमुद आहे. मुख्य ठिकाण नेमले असलेल्या कार्यालयाने उचित कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयास तीन दिवसांच्या आत कार्यालयास सादर करावा, असेही या परिपत्रकात नमुद आहे. संबंधित नेमलेल्या कर्मचाऱ्याने टपाल पोच व टपालची उचल केल्यानंतर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. व प्रकल्प कार्यालयातील हालचाल रजिस्टरमध्ये संबंधित कर्मचाऱ्याने उपस्थित झाल्याबाबतची स्वाक्षरी करणे आवश्यक असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी परिपत्रकात म्हटले आहे.प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी या नवीन टपाल सेवेसाठी ८ मध्यवर्ती केंद्र निश्चित केले आहेत. यात शासकीय आश्रमशाळा कोरची, आदिवासी मुलांचे वसतीगृह कुरखेडा, मुलांचे वसतीगृह देसाईगंज, मुलांचे वसतीगृह आरमोरी, मुलांचे वसतीगृह धानोरा, मुलांचे वसतीगृह चामोर्शी, मुलांचे वसतीगृह चातगाव व प्रकल्प कार्यालय गडचिरोली आदींचा समावेश आहे. कोरची शासकीय आश्रमशाळा या मध्यवर्ती केंद्रांमध्ये मसेली, ग्यारापत्ती, कोटगुल आदी आश्रमशाळा तसेच मुला- मुलींचे वसतीगृह कोरची आदींनी टपाल स्वीकारावी तसेच पोहोचवावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आदिवासी मुलांचे वसतीगृह कुरखेडा या मध्यवर्ती केंद्र ठिकाणी रामगड, अंगारा, घाटी, सोनसरी, येंगलखेडा आदी आश्रमशाळा तसेच कुरखेडा येथील मुलींचे वसतीगृह व मुलांचे वसतीगृह मालेवाडा येथील कर्मचाऱ्यांनी कुरखेडा येथे येऊन टपाल स्वीकारावी तसेच प्रकल्प कार्यालयाला पाठवावयाची टपाल पोहोचवावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अन्य ६ मध्यवर्ती केंद्र ठिकाणी त्या- त्या परिसरातील शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शाळांकडे प्रकल्प कार्यालयाने पाठविलेली टपाल स्वीकारावी तसेच प्रकल्प कार्यालयाला पाठवावयाची टपाल केंद्रस्थळी पोहोचवावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या नव्या टपाल व्यवस्थेमुळे दुर्गम भागातील लांब अंतरावर असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला येणे आवश्यक नाही. यामुळे आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचा आर्थिक खर्च व वेळेची बचत झाली आहे. यापूर्वी गडचिरोली प्रकल्पातील अनेक शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांचे कर्मचारी टपाल देण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला वारंवार येत होते. यामुळे प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून येत होती. मात्र आता ही गर्दी ओसरली आहे.