लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून थेट प्रक्षेपण कार्यक्रमाद्वारे सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमातून मागील पाच वर्षांचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली येथे बुधवारी सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत करण्यात आले.या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्रा.डॉ.आर.एस.वाघमारे आदी उपस्थित होते. वेब कास्टिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व बचतगटाशी थेट संवाद साधला. यावेळी बचतगटाच्या अध्यक्ष अनीता माडुके यांनी मिनी दालमिलद्वारे प्र्रगती साधण्याची यशोगाथा पंतप्रधानांना सांगितली. सदर महिला शेतकरी बचत गट महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची मानकरी ठरली आहे.मत्स्य व्यवसाय, कुकुट पालन, मत्स्य बिजोत्पादन व नवनवीन अवजारांद्वारे यांत्रिकीकरण करून उत्पादनात दुपटीने वाढ करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना केले. कृषी कल्याण योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, ठिंबक योजना व सिंचन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी शेतकरी, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी हजर होते.
पंतप्रधानांचा शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:08 IST
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून थेट प्रक्षेपण कार्यक्रमाद्वारे सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमातून मागील पाच वर्षांचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली येथे बुधवारी सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत करण्यात आले.या कार्यक्रमास ...
पंतप्रधानांचा शेतकऱ्यांशी संवाद
ठळक मुद्देवेब कास्टिंगद्वारे मार्गदर्शन : २०२२ पर्यंत शेतीतील उत्पन्न दुप्पट करण्यावर भर