शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

By admin | Updated: October 13, 2014 23:19 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळ सोमवारी दुपारी थंड झाली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी

पावसाने विरजण : गडचिरोली, आरमोरी, अहेरी क्षेत्रात निघाल्या सर्वच उमेदवारांच्या पदयात्रा, रॅलीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळ सोमवारी दुपारी थंड झाली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ३६ उमेदवार मैदानात आपले भाग्य अजमावित आहेत. ६७ आरमोरी विधानसभा मतुदार संघात सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात आहेत. ६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघात १३ तर ६९ अहेरी विधानसभा क्षेत्रात ९ उमेदवार निवडणुक लढत आहेत. गेले १२ दिवस चाललेली प्रचाराची रणधुमाळ सोमवारी थांबली. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारासह प्रमुख अपक्ष उमेदवारांनीही आज अखेरच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात रविवारी विविध राजकीय पक्षांतर्फे प्रचार रॅली तालुका मुख्यालय व मोठ्या गावांत काढण्यात आली होती. आजही अखेरच्या दिवशी तालुका ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आनंदराव गेडाम, भाजपकडून क्रिष्णा गजबे, शिवसेनेकडून रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण वट्टी, बसपाकडून कोमल ताडाम (बारसागडे), भारतीय कम्युनिष्ठ पक्षाकडून हिरालाल येरमे, अपक्ष प्रमुख उमेदवारांमध्ये नंदू नरोटे, जयेंंद्र चंदेल, फारवर्ड ब्लॉककडून नारायण जांभुळे रिंगणात आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग वगळता आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकाही मोठ्या नेत्याची प्रचारसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत झाली नाही. त्यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेना आदी पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज अखेरच्या दिवशी मतदार संघात रॅली काढली. गडचिरोली विधानसभा मतदार संघात रविवारपासूनच राजकीय पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. रविवारी शिवसेनेच्यावतीने चंद्रपूर मार्गावर मोटार- सायकल रॅली काढण्यात आली होती. आज अखेरच्या दिवशी सोमवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्र्टीच्या उमेदवारांनी शहरातून पदयात्रा काढून मतदारांना अभिवादन केले. भारतीय जनता पक्षाच्या रॅलीमध्ये उमेदवार डॉ. देवराव होळी यांच्यासह खासदार अशोक नेते व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली फिरविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत उमेदवार भाग्यश्री आत्राम, संयोगिता हलगेकर, राकॉचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश पोरेड्डीवार, अरूण हरडे आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने रॅली काढण्यात आली. यात उमेदवार केसरी उसेंडी, न. प. चे उपाध्यक्ष रमेश चौधरी, प्रा. राजेश कात्रटवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन समाज पक्षाने इंदिरा गांधी चौकातून शहराच्या चारही मार्गावर पदयात्रा काढली. यावेळी उमेदवार विलास कोडाप व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्यावतीनेही चामोर्शी, धानोरा, गडचिरोली आदी तालुका मुख्यालयात रविवारपासूनच रॅली काढण्यात येत आहे. उमेदवार सगुणा तलांडी यांनी मतदारांना रॅलीच्या माध्यमातून अभिवादन केले. अहेरी विधानसभा क्षेत्रातही आज अखेरच्या दिवशी अहेरी, आलापल्ली आदी दोन महत्वाच्या ठिकाणी रॅली काढण्यात आली. यांनी पदयात्रा व रॅली काढून आपले शक्तीप्रदर्शन केले. आज अहेरीत संततधार पाऊस असल्याने उमेदवारांनी पावसात भिजून मतदारांना अभिवादन केले. अहेरी विधानसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूधीर मुनगंटीवार यांच्या जाहीरसभा प्रचाराच्या काळात झाल्या. आज शक्तीप्रदर्शनानंतर उमेदवारांचे गुप्त प्रचार सुरू झाला आहे. त्या बरोबरच कोण आघाडीवर आहे. याबाबत सट्टा बाजारही आपले अंदाज बांधत आहे. स्लम भागात धनशक्तीचाही मोठा वापर होत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थितीवर निवडणूक व पोलीस विभाग लक्ष ठेवून आहेत. या क्षेत्रातील बहुतांश मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याने अतिरिक्त पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे.