शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भामरागडमध्ये पोस्टरबाजी; पोलिसांची धाव

By संजय तिपाले | Updated: December 2, 2023 11:50 IST

दरम्यान, या पोस्टरबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तेे हटविले आहे.

गडचिरोली : नक्षल्यांच्या सप्ताहाला २ डिसेंबरपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मीडदापल्लीजवळ पोस्टरबाजी करुन नक्षल्यांनी इशारा दिला आहे. या सप्ताहात घातपाती कारवायांचा धोका लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क आहे.  

दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षल्यांकडून पीएलजीए सप्ताह पाळला जातो. नक्षल्यांचे सशस्त्र संघटन पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिनानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सप्ताहात नक्षल्यांकडून पोलिसांना नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. २ डिसेंबरला ‘पीएलजीए’ सप्ताहाचा पहिलाच दिवस असून नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्ली जवळ बॅनर लावले. यात त्यांनी हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच यंत्रणेला इशारा देखील दिला आहे. त्यामुळे परिसरात  दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या पोस्टरबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तेे हटविले आहे. घातपाती कारवाया हाणून पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा संपूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असून नक्षल्यांच्या हालचालींवर गोपनिय यंत्रणेसह अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांचाही वॉच आहे. दरम्यान, नक्षली सप्ताहाच्या आधीख दहा दिवसांच्या अंतराने नक्षलवाद्यांनी तीन निष्पाप नागरिकांची हत्या केली. या घटनांनी दक्षिण गडचिरोलीत दहशत निर्माण झाली आहे. नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या वांगेतुरी (ता.एटापल्ली) येथे पोलिस मदत केंद्र सुरु केल्याचा तसेच मोबाइल टॉवर उभारल्याचा वार नक्षल्यांच्या जिव्हारी लागला आहे. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादी