दुसरा टप्पा : जिल्हा रूग्णालयात शुभारंभगडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. डिग्गीकर यांच्या हस्ते बालकांना प्रत्यक्ष डोज पाजून रविवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ओपीडी सभागृहात पल्स पोलिओ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जि.प.चे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, नजमा बेग, राहूल बरडे, शंकर तोगळे, आशिष पिंपळेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी व माता उपस्थित होत्या.
अतिरिक्त संचालकांच्या हस्ते पोलिओ डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 01:36 IST