शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान जखमी, नक्षल्यांकडील पिस्तूल व काडतुसं जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 20:36 IST

एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील आठवडी बाजारात गस्त करीत असलेल्या पोलीस पथकातील एका जवानावर नक्षल्यांनी हल्ला करून त्याच्याकडील रायफल हिसकण्याचा प्रयत्न केला.

एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील आठवडी बाजारात गस्त करीत असलेल्या पोलीस पथकातील एका जवानावर नक्षल्यांनी हल्ला करून त्याच्याकडील रायफल हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होत नसल्याचे पाहून चाकूने हल्ला केला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान गट्टाच्या बाजार परिसरात पायी गस्त घालत होते. यावेळी पोलीस नाईक गोंजी मट्टामी हे इतर सहका-यांपेक्षा मागे राहिले. त्यांना एकटे पाहून त्या परिसरात साध्या वेषात असलेल्या दोन ते तीन नक्षल्यांनी मट्टामी यांच्याकडील एके-४७ ही रायफल हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र मट्टामी यांनी जोरदार प्रतिकार करीत आपली रायफल नक्षल्यांच्या हाती लागू दिली नाही. यामुळे नक्षल्यांनी मट्टामीवर चालविण्यासाठी त्यांच्याकडील पिस्तूल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता मट्टामी यांनी ती पिस्तूल हिसकावून आपल्या ताब्यात घेतली.याच वेळी एका नक्षलवाद्याने चाकूने मट्टामी यांच्या छातीच्या खालील बाजूस भोसकले. यामुळे मट्टामी गंभीर जखमी झाले. यावेळी पोलीस पथकातील सहकारी मदतीसाठी धावले असता नक्षल्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंजी मट्टामी यांना गडचिरोलीवरून बोलविलेल्या पोलिसांच्या सेवेतील हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.