पाेलिसांनी ४०७ किलाे गांजा केला नष्ट, १३ कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई

By दिगांबर जवादे | Published: February 22, 2024 10:08 PM2024-02-22T22:08:15+5:302024-02-22T22:08:32+5:30

गडचिराेली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेलगतचा भाग नक्षल प्रभावित व घनदाट जंगलाने व्यापला आहे.

Police destroyed 407 kilos of ganja in 13 operations | पाेलिसांनी ४०७ किलाे गांजा केला नष्ट, १३ कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई

पाेलिसांनी ४०७ किलाे गांजा केला नष्ट, १३ कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई

गडचिरोली: जिल्ह्यातील विविध पाेलिस स्टेशनतर्फे १३ कारवाया करून जप्त करण्यात आलेला सुमारे ४०७ किलाे गांजा पाेलिसांनी नष्ट केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या मार्गदर्शनात सदर गांजा नष्ट करण्यात आला.

गडचिराेली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेलगतचा भाग नक्षल प्रभावित व घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे पाेलिस या भागात सहजासहजी पाेहाेचत नाहीत. याचा गैरफायदा छत्तीसगड राज्यातील नागरिकांकडून घेतला जातो. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाची शेती करतात. पुढे हा गांजा गडचिराेली जिल्हा मार्गे राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पाठवला जातो. गाेपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून पाेलिसांनी कारवाया केल्या.

गडचिराेली पाेलिस स्टेशनच्या पाेलिसांनी ४, आसरअल्ली २, अहेरी ३, चामाेर्शी, धानाेरा, मुलचेरा, रेपनपल्ली पाेलिस स्टेशनने एक अशा एकूण १३ कारवाया करून ४०७ क्विंटल गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ नाश समितीच्या परवानगीनंतर गांजा नष्ट करण्यात आला आहे. अमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सदस्य अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, पोलिस उपअधीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक उल्हास भुसारी, रासायनिक विश्लेषक विलास शिवाजी ठानगे, वजन मापे विभागाचे निरीक्षक प्रकाश उके, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच लाचुलू मडावी, अक्षय राऊत यांच्या परवागनीनंतर गांजा नष्ट करण्यात आला.

गांजा नष्ट करण्याची कारवाई करतेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, पाेलिस उपनिरीक्षक सरिता मरकाम, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अंमलदार नरेश सहारे, दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, शुक्राचारी गवई, राकेश सोनटक्के, हेमंत गेडाम, सुनील पुठ्ठावार, माणिक दुधबळे, उमेश जगदाळे, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनी केली.

Web Title: Police destroyed 407 kilos of ganja in 13 operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.