लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीच्या कब्जाबाबत दिलेल्या रिपोर्टचा निपटारा करण्याच्या कामासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.श्याम सुकाजी मानकर (५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील एका शेतकऱ्याची शेती गडचिरोली येथे आहे. या शेतीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केला आहे. हा कब्जा काढावा यासाठी सदर व्यक्तीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी मानकर याने तक्रारकर्त्याला ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. ती लाच स्वीकारताना मानकरला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. सदर कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरिक्षक यशवंत राऊत, रवी राजुलवार, एएसआय मोरेश्वर लाकडे, प्रमोद ढोरे, सतीश पत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, किशोर ठाकूर, गणेश वासेकर, तुळशीराम नवघडे, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.लाच स्वीकारताच काढला पळश्याम मानकर याने संबंधित शेतकऱ्याकडून आरमोरी मार्गावरील गोगाव फाट्याजवळ लाच स्वीकारली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला असल्याचे लक्षात आल्यानंतर मानकर याने गडचिरोलीच्या दिशेने दुचाकीने पळ काढला. गडचिरोली शहरात न येता वन विभागाच्या नाक्यावरून खरपुंडी मार्गाकडे दुचाकी वळविली. डम्पिंग यार्ड ओलांडून असलेल्या नाल्याजवळ त्याची दुचाकी घसरून तो जमिनीवर पडला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला पकडून जिल्हा रूग्णालयात भरती केले.
पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST
श्याम सुकाजी मानकर (५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील एका शेतकऱ्याची शेती गडचिरोली येथे आहे. या शेतीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केला आहे. हा कब्जा काढावा यासाठी सदर व्यक्तीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी मानकर याने तक्रारकर्त्याला ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
ठळक मुद्देशेतकऱ्याकडून मागितली लाच : गडचिरोली ठाण्यातील कर्मचारी