शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

नक्षल्यांशी लढणाऱ्या १० शूर जवानांना पोलीस शौर्य पदक

By admin | Updated: August 15, 2016 00:43 IST

गडचिरोली पोलीस दलात नक्षल्यांच्या विरोधात लढणाऱ्या १० शूर जीगरबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाने रविवारी पोलीस शौर्य पदक मंजूर केले आहे.

जाहीर : एका सहायक फौजदारांना पीएमएमएस पदकगडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात नक्षल्यांच्या विरोधात लढणाऱ्या १० शूर जीगरबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाने रविवारी पोलीस शौर्य पदक मंजूर केले आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कार्यरत असलेले सहायक फौजदार अनिल मधुकरराव दांगट यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेकरीता पीएमएमएस पदक जाहीर केले आहे. पोलीस शौर्य पदक मंजूर झालेल्या नऊ पोलीस जवानांमध्ये सहायक पोलीस निरिक्षक अतुल श्रावण तवाडे, पोलीस नाईक शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, प्रविण हंसराज भसारकर, बाबुराव महारू पदा, विनोद मेस्सो हिचामी, पोलीस हवालदार बस्तर लक्ष्मण मडावी, पोलीस नाईक शिपाई दिलीप ऋषी पोरेटी, दिनकरशहा बालसिंग कोरेटी, देवनाथ खुशाल काटेंगे, संजय लेंगाजी उसेंडी यांचा समावेश आहे. अती नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या या दहा लढवय्या पोलिसांनी जीवाला धोका पत्कारून केलेल्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. १७ आॅक्टोबर २०१३ रोजी एटापल्ली तालुक्यातील कसूरवाही, पेंदूलवाही, गोटीनवडा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविताना झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सहायक पोलीस निरिक्षक अतुल तवाडे, नाईक शिपाई इंदरशहा सडमेक, प्रविण भसारकर, बाबुराव पदा, विनोद हिचामी यांनी नक्षल्यांशी लढा दिला. नक्षली जंगलात पसार झाले. या कामगिरीसाठी पाच जणांना पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. १२ आॅगस्ट २०१४ रोजी खोब्रामेंढा जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात चकमक उडाली. यावेळी पोलीस हवालदार बस्तर मडावी, पोलीस नाईक शिपाई दिलीप पोरेटी, दिनकरशहा कोरेटी, देवनाथ काटेंगे, संजय उसेंडी या पाच जवानांनी नक्षल्यांशी लढा देऊन दोन नक्षलमृतादेहासह एक रायफल व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश मिळविले. यासाठी त्यांना शौर्य पदक जाहीर केले. या पोलीस जवानांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सोमवारी पोलीस मुख्यालयात सन्मानित केले जाणार आहे.