शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:44 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळाल्याने विद्यार्थिनींची प्रकृती सुधारत आहे.

ठळक मुद्देखमनचेरू येथील प्रकार : जेवणानंतर बिघडली प्रकृती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळाल्याने विद्यार्थिनींची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्यावर अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, खमनचेरु येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना आज सकाळी १० वाजता जेवण देण्यात आले. जेवणात पानकोबी, आलूची भाजी, वरण, भात, पोळी असा मेनू होता. जेवण आटोपल्यानंतर दुपारी १२ वाजताच्यादरम्यान काही विद्यार्थिनींना पोटात मळमळ होऊन उलटीचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता ५७ विद्यार्थिनींना हा त्रास सुरू झाला. त्यामुळे १.३० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना रुग्णवाहिकेने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात सायंकाळपर्यंत सर्व विद्यार्थिनीवर उपचार सुरु होते.विषबाधा झालेल्या ५७ विद्यार्थिनींमध्ये वर्ग १ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यांना अन्नातून विषबाधा कशी झाली, विद्यार्थिनींना दिलेल्या जेवणात कोणता पदार्थ शिळा होता का, याची चौकशी केली जात आहे. जेवणाची व्यवस्था पुरु ष अधीक्षक ए.एम.मसतकर यांच्याकडे असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस.ए.नन्नेवार यांनी ‘लोकमत’ला दिली. घटनेची माहिती अहेरी उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळताच पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर रोहनकर यांनी तपास सुरू केला आहे.आधी तीन मुलींना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. ही बाब लक्षात आल्यावर मी इतर शिक्षकांना माहिती दिली व वेळ न घालवता अशा प्रकारचा त्रास असणाऱ्या एकूण ५७ विद्यार्थिनींना अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.- एस.ए.नन्नेवार, मुख्याध्यापकघटनेची माहिती मिळताच दोन सहायक प्रकल्प अधिकाºयांना चौकशीसाठी पाठविण्यात आले. चौकशीअंती या घटनेसाठी दोषी असणाºयांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ.इंदूराणी जाखड, प्रकल्प अधिकारीतथा सहायक जिल्हाधिकारी

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य