शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

काव्यातून समाज जीवनाचे वास्तव उलगडले

By admin | Updated: October 27, 2016 01:43 IST

नक्षत्राचे देणं काव्यमंच पुणे, झाडी बोली साहित्य मंडळ व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने

३० कवींचा सहभाग : राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कवी संमेलनगडचिरोली : नक्षत्राचे देणं काव्यमंच पुणे, झाडी बोली साहित्य मंडळ व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शाखेच्या सामुदायिक प्रार्थना मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सोमवारी विदर्भस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले. या संमेलनात विदर्भातील ३० कवींनी सहभाग नोंदवून आपल्या काव्यातून समाज जीवनाचे वास्तव मांडले.कवी संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य खंजेरीकार बंडोपंत बोढेकर होते. उद्घाटन झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजना खुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भूवैकूंठ अड्याळ टेकडीचे अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, दलित मित्र नानाजी वाढई, पंडित पुडके, आत्माराम आंबोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कवी संमेलनात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील ३० कवींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. राष्ट्रसंत वंदना गायनाने संमेलनाची सुरुवात झाली. सुरेंद्र इंगळे यांनी ‘शेतकऱ्यांची आत्महत्या’, संगीता धोटे यांनी ‘तुलाच विचारते आई’, खुशालदास कामडी यांनी ‘हुंड्याची करामत’, रमेश भोयर यांनी ‘भिजली आहे धरती’, शालिक दानव यांनी ‘दुष्काळ’ नावाची कविता सादर केली. क्षितीज शिवरकर यांनी ‘तुझी लेक’, माधव कौरासे यांनी ‘पावर’, अमोल मोरे यांनी ‘जगावं तर कसं, मराव तर कसं’, ईश्वर मत्ते यांनी ‘जगणे आजच, उद्या काय रे...’, महादेव हुलके यांनी ‘शेतकऱ्यांची व्यथा’, सतीश लोंढे यांनी ‘राष्ट्रसंत तुकडोजी’, नरहरी रामटेके यांनी ‘पटलं तर घ्या’, वंदना तिवारी यांनी ‘मॉ’, सिद्धार्थ वालदे यांनी ‘काय करेल दैव गती’, पांडुरंग नंदागवडी यांनी ‘सैनिक भाऊ माझा’, एकनाथ बुद्धे यांनी ‘उरी हल्ला’, वसंत कुलसंगे यांनी ‘स्वातंत्र संग्राम’, मधुकर जंबेवार यांनी ‘स्वर्गाचे द्वार’, जयंत येलमुले यांनी ‘संदर्भ’, मुरलीधर बद्दलवार यांनी ‘जंगल माझं गाव’, डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी ‘बापू’, देवराव भोगेवार यांनी ‘मॉ-बाप’, अनिल पिट्टलवार यांनी ‘राष्ट्रसंत’, सूरज गोरंतवार यांनी ‘अर्ज’, गुलाब मुळे यांनी ‘इन्कलाबी घाव झाले’ ही कविता सादर केली. चेतन ठाकरे यांनी ‘पूर्वीची माणसं जितकी खरी होती, तितकाच पाऊस सुद्धा खरा होता’ या आशयाची कविता सादर केली. अंजनाबाई खुणे यांनी आपल्या रंगततदार शैैलीत ‘एक तरी झाड लावा व वृद्धाची व्यथा ही वास्तववादी कविता सादर केली. बंडोपंत बोढेकर यांनी ‘गांधीगिरी’ कवितेतून महात्मा गांधींचा त्याग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा केला. सहभागी सर्वच कवींना ग्रामगीता व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन चेतन ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी राहूल आंबोरकर, भोगेवार, निकुरे, वेठे व गुरूदेव भक्तांनी सहकार्य केले.