शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

वैरागडातील फेडरेशनच्या केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 5:00 AM

भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण भागासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने प्रती क्विंटल १ हजार ८२५ रुपये हमीभाव देऊन धानाची खरेदी केली जाते. नागरी भागासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी-विक्री संस्था आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र यंदाच्या खरीप हंगामात सुरू करण्यात आले. येथे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ४० रुपये हमाली म्हणून घेतले जात आहेत.

ठळक मुद्देकेंद्र चालकांची मनमानी : क्विंटलमागे घेतली जाते २० रुपये हमाली

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली अंतर्गत वैरागड येथे महाराष्ट्र राईसमिलच्या गोदामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र या केंद्रावर धानाचे मोजमाप करताना शेतकऱ्यांना क्विंटलमागे ४० रुपये हमाली म्हणून द्यावी लागत आहे. येथे केंद्रसंचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप अनेक शेतकºयांनी केला आहे.भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण भागासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने प्रती क्विंटल १ हजार ८२५ रुपये हमीभाव देऊन धानाची खरेदी केली जाते. नागरी भागासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी-विक्री संस्था आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र यंदाच्या खरीप हंगामात सुरू करण्यात आले. येथे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ४० रुपये हमाली म्हणून घेतले जात आहेत.याच परिसरात देलनवाडी, कढोली, उराडी येथे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविकास संस्थांच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू आहे. मात्र या केंद्रांवर हमालीचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले जात नाही. भारतीय खाद्य निगमचे धोरण व नियम सर्वांसाठी सारखे असताना फेडरेशनच्या केंद्रावर शेतकऱ्यांकडून हमाली घेतली जाते. हे अन्यायकारक असल्याचे सांगत क्विंटलमागे २० रुपये हमाली देण्याबाबत आक्षेप घेतला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन्ही संस्थेचे नियम सारखे असताना वैरागड येथील केंद्र संचालक नियमांची पायमल्ली करून फेडरेशनच्या केंद्रावर शेतकऱ्यांकडून हमालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे. संबंधित केंद्र संचालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.केंद्रावर हमाली करणाऱ्या मजुरांना पाच ते सहा महिने मजुरी मिळते. त्यानंतर त्यांना काम मिळत नाही. मग ते पोट कसे भरणार म्हणून प्रत्येक ४० किलोच्या पोत्यामागे १० रुपयेप्रमाणे हमाली घेतली जात आहे. धानाचे मोजमाप प्रथम व्हावे, यासाठी शेतकरी केंद्रावर मजुरी करणाºया लोकांना पैसे देण्यास तयार होतात.- अमित पुसाम,केंद्र प्रमुख, धान खरेदी केंद्र, वैरागड