शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गर्भवतींचे हाल थांबेनात, भामरागडमध्ये बोटीद्वारे काढली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 14:49 IST

बचाव पथकाची सतर्कता: बोटीद्वारे ओलांडला नाला

लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : पावसाने उसंत दिली असली, तरी संततधार पावसामुळे दुर्गम भागातील नाल्यांमधील पूर ओसरलेला नाही. यामुळे पूल नसलेल्या नाले ओलांडताना कसरतच करावी लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यात रविवारी घडला. ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेला नाल्याच्या पुरातून बोटीने रेस्क्यू करून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात सुखरूप पोहोचविण्यात आले. पुरामुळे गर्भवती तसेच जखमी रुग्णांचे हाल होण्याचे सत्र सुरूच आहे.

भामरागड तालुक्यातील कुचेर येथील शीला सडमेक या ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे प्रसूती दिवस अगदी जवळ आल्याने तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. दरम्यान, पावसामुळे इरपनार गावाजवळील नाला तुडुंब भरून वाहत होता. गरोदर महिला आपल्या पतीसह मोटारसायकलने रुग्णालयात जाण्यासाठी निघाली; परंतु इरपणार गावाजवळचा नाला तुडुंब भरून वाहत होता. नाला ओलांडून रुग्णालयात पोहोचणे शक्य नव्हते. ही माहिती तहसीलदार किशोर बागडे यांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी तत्काळ नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांच्यावर जबाबदारी सोपवून महिलेचा रेस्क्यू करण्यास सांगितले. पुप्पलवार यांनी नगरपंचायत व तहसीलची बोट उपलब्ध केली.

"इरपणार व कुचेर हा भाग नक्षलग्रस्त आहे. यामुळे त्या भागात एसडीआरएफ जवानांची चमू रेस्क्यूसाठी नेणे धोक्याचे ठरले असते. यासाठी आम्ही सतर्कता बाळगून नगर पंचायत व तहसीलमधील बचाव पथकाद्वारे रेस्क्यू केला व तो सफलसुद्धा झाला."- प्रकाश पुप्पलवार, नायब तहसीलदार

"कुचेर येथील गर्भवती शीला सडमेक ही सध्या सुखरूप आहे. प्रसूतीसाठी काही दिवस अवधी आहे. तिच्या प्रकृतीची काळजी महिला कर्मचारी घेत आहेत. आतापर्यंत अनेक गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती करण्यात आली."- डॉ. भूषण चौधरी, वैद्यकीय अधिकारी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली