ऑनलाईन लोकमतकमलापूर : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रेपनपल्ली ग्राम पंचायतमध्ये विशेष ग्रामसभा जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेत तीन वर्षाच्या तेंदू बोनसचे नियोजन करण्यात आले. दरम्यान अनेक विषयांवर चर्चाही करण्यात आली.या सभेला पं. स. सभापती सुरेखा आलाम, जि. प. सदस्य अजय नैैताम, सरपंच ईश्वरी सिडाम, पं. स. सदस्य भाष्कर तलांडे, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम उपस्थित होते.तेंदूबोनस वितरणासंदर्भात मागील ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या ग्रामसभेला जि. प. उपाध्यक्षांनी स्वत: उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. २०१५-१६-१७ मधील बोनसची रक्कम किमती शिल्लक आहे व किती वितरण करायची आहे. याबाबत नियोजन करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, काही लोक राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन ग्रा. पं. चा अपप्रचार करीत आहेत, असेही सांगण्यात आले.
तीन वर्षाच्या तेंदू बोनसचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:37 IST
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रेपनपल्ली ग्राम पंचायतमध्ये विशेष ग्रामसभा जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
तीन वर्षाच्या तेंदू बोनसचे नियोजन
ठळक मुद्देअनेक विषयांवर चर्चा : रेपनपल्लीत जि. प. उपाध्यक्षांच्या उपस्थितीत ग्रामसभा