गडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात दरवर्षी सुधारणा करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू आहे. गतवर्षीपेक्षा यंदा २0१४-१५ वर्षात आत्मा योजनेच्या आर्थिक नियोजन वाढले असून तंत्रज्ञानातून कृषी विकासावर भर देण्यात येत आहे. आत्मा योजनेंतर्गत कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात. यंदाच्या नियोजनात आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षणासाठी ६.७८ लाखाची तरतूद करण्यात आली असून प्रति शेतकरी १ हजार २00 रूपये खर्च करण्यात येणार आहे. राज्यांतर्गत प्रशिक्षणावर १४.९४ लक्ष रूपयाची तरतूद असून प्रति शेतकरी १ हजार रूपये खर्च होणार आहे. जिल्ह्याअंतर्गत प्रशिक्षणावर प्रति शेतकरी ४00 रूपये खर्च करावयाचा असून यासाठी ४५.0४ लक्ष रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. आत्मा योजनेंतर्गत कृषी प्रात्यक्षिक व शेतकर्यांच्या क्षेत्रीय भेटीचा कार्यक्रम करण्यात येतो. कृषी प्रात्यक्षिकासाठी ६0 लक्ष रूपये, संलग्न विभागाकडील प्रात्यक्षिकावर २४.६४ लक्ष रूपये तसेच शेतकरी तंत्रज्ञान प्रसारण व क्षेत्रीय भेटीसाठी २४.४३ लक्ष रूपयाची तरतूद आहे. आत्मा योजनेंतर्गत शेतकर्यांची शैक्षणिक सहलही काढण्यात येते. आंतरराज्य सहलीसाठी ४.४0, राज्याअंतर्गत शैक्षणिक सहलीसाठी १0.२४, जिल्ह्याअंतर्गत १0.४४ लक्ष रूपयाचा खर्च करण्यात येणार आहे. चांगले काम करणार्या शेतकर्यांच्या बक्षीस योजनेवर ६ लक्ष रूपयाचा खर्च अपेक्षीत आहे. सीडी व माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे कृषी योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी १.४0 लक्ष रूपयाची तरतूद आत्मा योजनेत जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. आत्मा योजनेंतर्गत किसान गोष्टी व क्षेत्रीय भेटीचे २४ कार्यक्रमाचे नियोजन आहे. यापोटी ३.६0 लक्ष रूपयाचा खर्च होणार असल्याचे कृषी विभागाच्या निवेदनात नमूद आहे. कृषी विज्ञान केंद्र व इतर संस्थांच्या संशोधनाच्या माध्यमातून प्राप्त शिफारशीचा अवलंब जिल्ह्यात करण्यात येतो. यासाठी ५ लक्ष रूपयाचा खर्च अपेक्षीत आहे. आत्मा योजनेंतर्गत विशेष तज्ज्ञ व कार्यकारी सहाय्यक यांच्या नेमणुकीवर १६.५६ लक्ष रूपयाचा खर्च होणार आहे. प्रवासभत्ता व कार्यालयिन खर्चासाठी ७.८0 लाखाची तरतूद आहे. तालुका गट तंत्रज्ञान व्यवस्थापनावर २८.८0, जिल्हा शेतकरी सल्लागार समितीच्या सभेवर ८0 हजाराचा खर्च होणार आहे. संगणक खरेदीसाठी चार लाख रूपयाचा खर्च आत्मा योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून ३६ शेती शाळेचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी १0.५६ लक्ष रूपये, शेतकरी मित्रावरही ५0.१0 लक्ष रूपयाचा खर्च अपेक्षीत आहे. एकूणच आत्मा योजनेचे यंदाचे आर्थिक नियोजन ४२३.२५ लक्ष रूपयाचे आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘आत्मा’चे नियोजन वाढले
By admin | Updated: June 4, 2014 23:45 IST