शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

‘पाेलीसदादा लाेरा खिडकी’ थांबविणार वंचित गावकऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

‘पाेलीसदादा लाेरा खिडकी’ या अनाेख्या उपक्रमात लाेरा हा माडिया भाषेतील शब्द वापरण्यात आला आहे. लाेरा म्हणजे यांचा किंवा यांची असा अर्थ हाेताे. या उपक्रमास पाेलीसदादांची खिडकी असेही म्हणता येईल. या खिडकीच्या कक्षात संगणक, इंटरनेट, वायफाय, प्रिंटर, स्कॅनर यासह ऑनलाईन कामांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देलाहेरी पाेलिसांचा अनाेखा उपक्रम : दाखले काढण्यासह ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा

लाेकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : शासकीय याेजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दुर्गम भागातील नागरिकांकडे अद्यापही नाहीत. प्रमाणपत्रे व दाखले प्राप्त करण्यासाठी दुर्गम भागातून नागरिकांना तालुका मुख्यालयात पायपीट करावी लागते. यात त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. नागरिकांची ही परवड जाणून लाहेरी उपपाेलीस स्टेशनने ‘पाेलीसदादा लाेरा खिडकी’ हा अनाेखा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन दाखले तसेच प्रमाणपत्र व याेजनांच्या लाभासाठी अर्ज भरण्याची सुविधा केल्याने गरीब वंचित नागरिकांची पायपीट थांबण्यास मदत झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून लाहेरी परिसराची ओळख आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीज पाेहाेचली नाही. मूलभूत साेयींचा अभाव आहे. त्यातच एका प्रमाणपत्रासाठी किंवा दाखल्यासाठी नागरिकांना ४० ते ५० किमीची पायपीट करून भामरागड तालुका मुख्यालयात यावे लागते. प्रवास करूनही एका दिवशी काम हाेईल याची शाश्वती  नसते. अनेकदा दोन ते चार दिवस ताटकळत राहून मुक्काम ठाेकावा लागताे. तेव्हाच दाखले किंवा प्रमाणपत्रे मिळतात. मानसिक, शारीरिक त्रासासह आर्थिक भारसुद्धा गरीब नागरिकांना साेसावा लागताे. दुर्गम भागातील नागरिकांची ही दयनीय स्थिती पाहून, पाेलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या पुढाकारातून लाहेरी उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी लाहेरी येथे एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. ‘पोलीसदादा लोरा खिडकी’ असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमाची सुरुवात गुरुवार, २५ फेब्रुवारीला प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली. गावातील ज्येष्ठ महिला नागूबाई घोसरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांची पायपीट थांबण्यास मदत हाेणार आहे. याप्रसंगी सीआरपीएफ ३७ बटालीयनचे सहायक कमांडंट संतोष भोसले, पाेलीस निरीक्षक शीतलाप्रसाद, पीएसआय विजय सपकाळ, महादेव भालेराव, आकाश विटे, पाेलीस हवालदार तुकाराम हिचामी उपस्थित हाेते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालू नामेवार, पोलीस नाईक फिरोज गाठले, यशवंत दाणी, वर्षा डांगे, पाेलीस शिपाई मालू पुंगाटी, नितीन जुवारे, संदीप आत्राम, अमित कुलेटी, ईश्वरलाल नेताम, पुरुषोत्तम कुमरे, रेश्मा गेडाम, रत्नमाला जुमनाके, वैशाली चव्हाण, सुजाता जुमनाके, कल्लू मेश्राम, प्रणाली कांबळे, शोभा गोदारी, योगिता हिचामी यांनी सहकार्य केले.

खिडकीतून हाेणार विविध कामे‘पाेलीसदादा लाेरा खिडकी’ या अनाेख्या उपक्रमात लाेरा हा माडिया भाषेतील शब्द वापरण्यात आला आहे. लाेरा म्हणजे यांचा किंवा यांची असा अर्थ हाेताे. या उपक्रमास पाेलीसदादांची खिडकी असेही म्हणता येईल. या खिडकीच्या कक्षात संगणक, इंटरनेट, वायफाय, प्रिंटर, स्कॅनर यासह ऑनलाईन कामांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहेत. येथे मोबाईल रिचार्ज करणे, ऑनलाईन सातबारा, नमुुना- ८,  बँक खाते उघडणे, निराधार याेजनांचे अर्ज भरणे, शेतीविषयक कागदपत्रे काढणे तसेच अन्य ऑनलाईन कामे करण्याची सुविधा लाहेरी पाेलिसांनी उपलब्ध केली आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस