शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिकअपची दुचाकीला धडक, नवरदेवाची आई ठार

By दिलीप दहेलकर | Updated: May 3, 2024 01:55 IST

आपल्या लहान मुलाचे लग्न आटाेपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गडचिराेली : नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली पिकअपला बांधून नेत असताना सदर पिकअप वाहनाने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार तर एक युवक गंभरी जखमी झाल्याची घटना २ एप्रिल राेजी गुरूवारला सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास शहरातील मुल मार्गावर कारगिल चाैकात घडली. विशेष आपल्या लहान मुलाचे लग्न आटाेपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेखा नामदेव राऊत (४४) रा. सावली जि. चंद्रपूर असे मृतक महिलेचे नाव आहे. तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७) रा. सावली. हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर गडचिराेली पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दाेनही जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान रक्तबंबाळ झालेल्या रेखा राऊत या महिलेचा मृत्यु झाला. तर जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सावली येथील नामदेव राऊत यांच्या दाेन मुलाचे लग्न हाेते. अमित राऊत नामक माेठया मुलाचे लग्न १ मे बुधवारला राेजी सावली येथे पार पडले. तर २ मे राेजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे हाेते. सदर लग्नकार्य आटाेपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीवर गडचिराेलीमार्गे सावलीकडे जात हाेती. दरम्यान कारगिल चाैकात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

अपघाताची पुनरावृत्तीविशेष म्हणजे मागील वर्षी १ मे २०२३ राेजी याच कारगिल चौकात एका युवकाला ट्रकने जागीच चिरडले होते. एक वर्षानंतर परत याच ठिकाणी याच तारखेला अपघात झाला. शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचा दुर्लक्षितपणा जीवघेणा ठरत ठरत असल्याचे नागरिकांमधून बाेलले जात आहे. 

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली