शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक अंतर तारक, तर भावनिक अंतर ठरू शकते मारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे.

ठळक मुद्देआजार नियंत्रणासाठी सकारात्मक राहा : विलगीकरणातील लोकांवर मात्र मानसिक दडपण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सामाजिक जीवन बदलून टाकणाऱ्या कोरोना विषाणुची पावले आता सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही पडली आहेत. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. गडचिरोलीच्या रानावनात फिरणाºया कणखर नागरिकांना कोरोनाचा विषाणू सहजपणे आपल्या कवेत घेणे शक्य नाही, मात्र कोरोनाच्या भितीपोटी शारीरिक अंतरासोबत ठेवले जात असलेले भावनिक अंतर सामान्य नागरिकालाही रुग्ण बनविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. मात्र विलगिकरण कक्षात ठेवलेले लोक जणूकाही कोरोनाबाधित रुग्णच आहेत आणि त्यांना कोरोना झाला म्हणजे त्यांनी काहीतरी अपराध केला आहे, अशा भावनेतून त्यांच्याकडे लोक पाहात आहेत. विशेष म्हणजे विलगिकरण कक्षात किंवा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेले लोक स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर निश्चिंतपणे घरी जातात. पण संशयमुक्त झाल्यानंतरही लोक त्यांच्यापासून अंतर ठेवून वागत आहेत. ही बाब अनेकांना कोड्यात टाकत आहे.विषाणूची बाधा होऊ नये म्हणून एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवण्याचा नियम पाळण्याची सवय आता पुढील अनेक महिने सर्वांनाच करावी लागणार आहे. मात्र हे करताना एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, आपलेपणा, माणुसकी कमी झाल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाहेर जिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजूरवर्गासह अनेकांना गावात घेण्यासही लोक तयार होत नव्हते. यासाठी आरोग्य विभागाला योग्य ती जनजागृती करावी लागणार आहे.त्यांना हवी होम क्वॉरंटाईनची मुभाजिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७३५ लोक संस्थात्मक विलगिकरणात आहेत. ज्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विलगिकरण कक्षात आणून १४ दिवस ठेवले जात आहे. रुग्णसंख्या वाढल्यास विलगिकरण कक्षासाठी शाळा-वसतिगृहे कमी पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना, जर त्यांच्या निवासस्थानी विलगिकरण कक्षाप्रमाणे स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह आणि इतरांचा संपर्क येणार नाही अशी व्यवस्था असेल तर गृह विलगिकरणाची मुभा देणे गरजेचे आहे. यामुळे शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन संबंधित व्यक्तीलाही विलगिकरण कक्षातील वातावरणामुळे होणारा रुग्णासारखा आभास होणार नाही.मायेच्या उपचारातून मिळते सकारात्मक ऊर्जाअनेक ठिकाणच्या विलगिकरण कक्षात ५ ते १० जणांसाठी एकच शौचालय, स्रानगृह आहे. शिवाय जेवणासाठी डबा आणून देणाºया लोकांचा एखाद्या बाधित व्यक्तीशी संपर्क येऊन त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याऊलट घरी विलगिकरणाची पुरेशी सोय असणाºयांना ती मुभा दिल्यास कौटुंबिय मायेतून संबंधित व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळून ती व्यक्ती ठणठणीत राहू शकते. याचा आरोग्य प्रशासनाने गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या