शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

गडचिरोलीच्या कुरखेडात थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 10:50 IST

कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देतिघांना संशयावरून ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे. हे थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाली. वैद्यकीय अधिकारी व पोलीस गावात पोहचले असून त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.थिमेट ही एक स्फोटक रसायनिक पावडर असून तिचा उपयोग शेतातील वा घरातील वाळवी नष्ट करण्यासाठी तसेच वन्यपशूंना पळवून लावण्यासाठी केला जातो. या पावडरीला कणकेत मिसळून त्याचे गोळे शेतात टाकले जातात. एखाद्या जनावराने ते तोंडात घेऊन चावले असता त्याचा स्फोट होतो व तो वन्यपशू जखमी होतो. गावकरी याचा वापर नेहमी करीत असतात.कुरखेडापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला गावाचा समावेश नान्ही ग्रामपंचायतींतर्गत होतो. गावातील काही महिला गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या. या पाण्याने बनवलेला चहा घेताच दोन-तीन जणांना उलट्या होऊ लागल्या. काही महिलांनी स्वयंपाक करण्यास सुरु वात केली. परंतु स्वयंपाकालाहीही दुर्गंधी येऊ लागली. काही क्षणातच ही वार्ता गावभर पसरली. घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम घटनास्थळी गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ.दामले व सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर हेही आपल्या सहकाऱ्यांसह धमदीटोला येथे पोहचले. त्यांनी चर्चा करु न माहिती घेतली. यावेळी सार्वजनिक विहिरीची पाहणी केली असता त्यात थिमेट हा रासायनिक पदार्थ टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.यावेळी सर्वांनी विहिरीतील पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी करु न औषधोपचार केला. याप्रसंगी सरपंच वर्षा धुर्वे, उपसरपंच सुखदेव कोरेटी हेही उपस्थित होते.नागरिकांनी वेळीच साविधगरी बाळगल्याने व वैद्यकीय अधिकारी वेळेवर पोहचल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर विषबाधा होण्यापासून बचावले. या विहिरीत ही थिमेट पावडर कुणी टाकली, याचा शोध पोलिस घेत आहेत. संशयावरून तिघांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य