शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

उत्सवात लोकसहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 10:15 PM

दुर्गा व शारदा मंडळांच्या वतीने नवरात्री दरम्यान धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविले जातात. या उपक्रमांना अधिक चांगले करण्यासाठी लोकसहकार्याची व लोकसहभागाची गरज आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत ३० वर्षांची परंपरा : सार्वजनिक दुर्गा व शारदा उत्सव मंडळांची अपेक्षा आणि अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गा व शारदा मंडळांच्या वतीने नवरात्री दरम्यान धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविले जातात. या उपक्रमांना अधिक चांगले करण्यासाठी लोकसहकार्याची व लोकसहभागाची गरज आहे. वाढत्या महागाईमध्ये लोकवर्गणी कमी पडत असल्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात अडचणी येत आहेत. मागील काही वर्षात मिरवणुकांचा खर्च वाढला आहे. हा खर्च कमी करण्यासाठी मंडळातील काही सूजान सदस्य प्रयत्नशील आहेत, असे मत लोकमतर्फे आयोजित परिचर्चेत शारदा व दुर्गा मंडळांच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले.लोकमत तर्फे ‘शारदा व दुर्गा मंडळांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर शनिवारी लोकमत कार्यालयात परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत आशीर्वाद नगरातील नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य सुधाकर मने, उपाध्यक्ष प्रजोत प्रभाकर मने, युवा गर्जना फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल तिडके, कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, रेड्डी गोडाऊन येथील नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मनिष भुस्कडे, दुगार्माता मंदिर मंडळाचे सदस्य कुणाल चावके, प्रविण न्यालावार उपस्थित होते.गडचिरोली शहरात दुर्गा व शारदा उत्सवाची मागील ३० वर्षांपासून परंपरा आहे. सुरूवातीला गणपती जास्त प्रमाणात मांडले जात होते. मात्र त्या कालावधीत पाऊस राहत असल्याने नागरिक नवरात्र दरम्यान चालणाºया दुर्गा उत्सवाकडे वळले आहेत. आज गडचिरोली शहरातील सर्वात मोठा उत्सव म्हणून दुर्गा उत्सव ओळखल्या जाते. दुर्गा उत्सवादरम्यान झाकी, बॅनर, पोस्टर आदींच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वीच्या तुलनेत लोकवर्गणी देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फटका मंडळांना बसत आहे. मंडळाच्या सदस्यांंकडूनच अधिकाधिक वर्गणी गोळा करावी लागत आहे. नागरिकांना एकत्र करणे हा उत्सवांचा महत्त्वाचा हेतू आहे. मात्र काळाच्या ओघात यापासून काही मंडळे दूर जात असल्याचे दिसून येत आहे. तरीही काही मंडळे आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. लोकवगर्णीच्या पैशातून विविध सामाजिक उपक्रम घेत आहेत. काही दुर्गा मंडळांच्या परिसरात अवयव दान, बेटी बचाव, वृक्षारोपण, रक्तदान आदी विषयी जनजागृती करणारे पोस्टर लावले आहेत. काही मंडळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करून मंडळाचे कार्यकर्ते स्वत: रक्तदान करतात.बदल्या काळानुसार दुर्गा उत्सवाचे स्वरूप थोडेफार बदलले आहे. हे निश्चितच मान्य करावे लागेल. पूर्वीच्या तुलनेत विजेचा झगमगाट वाढला आहे. डीजे, बँड पथक यासारख्या बाबींवर थोडा खर्च वाढला आहे. ही बाब जरी लक्षात घेतली तरी अजुनही काही मंडळे सामाजिक उपक्रम राबवित आहेत व सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य राहिल, असा आशावाद चर्चेदरम्यान दुर्गा व शारदा उत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला.परवानगीसाठी माराव्या लागतात चकरादुर्गा उत्सवाची परवानगी घेणे हे अत्यंत कठीण काम झाले आहे. दुर्गा मांडण्यासाठी सर्वप्रथम धर्मदाय आयुक्तांकडे परवानगी घ्यावी लागले. विशेष म्हणजे, सदर परवानगी तात्पुरती राहत असल्याने दरवर्षीच परवानगी घेण्याचे ओझे वाहावे लागते. धर्मदाय आयुक्तांच्या परवानगी बरोबरच नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागते. अधिकृत वीज जोडणीसाठीसुध्दा अनेक कागदे जोडावी लागतात. यासाठी मंडळांच्या पदाधिकाºयांचे १० ते १५ दिवस खर्च होतात. त्यामुळे काही मंडळांनी दुर्गा व शारदा मांडणे बंद केले आहे. प्रशासनाने परवानगीची जरूर सक्ती करावी, मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रे कमी करावी, अशी अपेक्षा मंडळाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली आहे.बहुतांश मंडळांकडे अधिकृत वीज जोडणीदुर्गा उत्सवासाठी हजारो लाईट लावले जातात. त्यामुळे एवढा लोड घरगुती मीटर सहन करू शकत नाही. मुख्य वीज तारेवर सुमारे ११ ते ३३ केव्हीचा वीज दाब राहतो. साऊंड सिस्टीम व लाईटांसाठी डेकोरेशन मालकाकडे लाखो रूपयांची मशीन राहतात. या मशीन जळून खाक होण्याची भिती राहते. परिणामी कोणताच डेकोरेशन मालक सरळ तारावरून वीज प्रवाह घेऊ देत नाही. अपवाद वगळता सर्वच मंडळांनी वीज विभागाकडे डिमांड भरून अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. तरीही वीज विभागाचे अधिकारी एकाही मंडळाने विजेसाठी परवानगी घेतली नाही, असे सांगत आहेत. त्यांनी सांगितलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी आहे. त्यांनी स्वत:चे दस्तावेज तपासूनच माध्यमांना माहिती द्यावी.वीज डिमांडची रक्कम गडपथ्री फेजसाठी १० हजार रुपये व सिंगल फेज साठी चार हजार रुपये डिमांड भरला जातो. १० दिवसांच्या कालावधीत जेवढे विजेचा वापर झाला. तेवढा बिल कपात करून उर्वरित डिमांडमधील रक्कम परत करणे आवश्यक आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून एमएसईबीने एकाही मंडळांला डिमांडची रक्कम परत केली नाही. रक्कम परत करण्यासाठी मंडळाचे बँक खाते असणे सक्तीचे आहे. मात्र मंडळाचा बँक खाते राहत नाही. मंडळाच्या अध्यक्षाच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही मंडळाच्या पदाधिकाºयांनी केली.२ आॅक्टोबरला विसर्जनाची परवानगी मिळावीदसºयाच्या दिवशी दिवशी दुर्गेचे विसर्जन करणे शक्य नाही. दुसºया दिवशी विसर्जन केले जाते. गडचिरोली शहरात ३० पेक्षा अधिक सार्वजनिक दुर्गा मांडण्यात आल्या आहेत. एकाच दिवशी अनेकांना बँड पथक व डीजे भाड्याने मिळत नाही. त्यामुळे दसºयाच्या तिसºया दिवशीही काही मंडळे विसर्जन करतात. मात्र यावर्षी पोलीस स्टेशनच्या वतीने २ आॅक्टोबरला (दसºयाच्या तिसºया दिवशी) विसर्जन करण्यास परवानगी नाकारली आहे. एकाच दिवशी विसर्जन करणे गैरसोयीचे होणार असल्याने २ आॅक्टोबरला विसर्जनाची परवानगी देण्याची मागणी मंडळांच्या पदाधिका?्यांनी केली आहे.