शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मेडीगड्डासाठी 138.91 हेक्टर शेतजमिनीचे भूसंपादन अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:41 IST

सन २०१६मध्ये तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणा सरकारच्या या प्रकल्पाकरिता हिरवा झेंडा दाखवून २३ ऑगस्ट २०१६ रोजी दोन्ही राज्यांमध्ये सिंचन प्रकल्पाचा करारनामा केला होता. त्यावेळी सिरोंचा तालुक्यातून या प्रकल्पासाठी विरोध झाला. परंतु, तत्कालीन पालकमंत्र्यांनी गावागावात समर्थन रॅली काढून मेडीगड्डा प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग सुकर केला. 

महेश आगुलालाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पासाठी भूसंपादन केल्या जाणाऱ्या ३७३.८० हेक्टर शेतजमिनीपैकी १३८.९१ हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण गेल्या तीन वर्षांपासून लालफितीत अडकले आहे. त्याचा फटका या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रकल्पाच्या वरच्या भागातील बॅक वाॅटरमुळे शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली जात आहे तर मेडीगड्डाच्या खालच्या भागातील शेकडो हेक्टर शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून जाऊन गोदावरी नदीच्या पात्रात मिसळत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी भूमिहीन  होत  आहे.सन २०१६मध्ये तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणा सरकारच्या या प्रकल्पाकरिता हिरवा झेंडा दाखवून २३ ऑगस्ट २०१६ रोजी दोन्ही राज्यांमध्ये सिंचन प्रकल्पाचा करारनामा केला होता. त्यावेळी सिरोंचा तालुक्यातून या प्रकल्पासाठी विरोध झाला. परंतु, तत्कालीन पालकमंत्र्यांनी गावागावात समर्थन रॅली काढून मेडीगड्डा प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग सुकर केला. आज वास्तविक पाहता या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जात आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी मोबदल्यासाठी उपोषण करत आहेत.

आवश्यकता ३७८ हेक्टरची, पण खरेदी २३४.९१ हेक्टरचीच-    सन २०१६ ते २०१९ या कालावधीत मेडीगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाकरिता केलेल्या सर्वेक्षणांतर्गत या प्रकल्पासाठी ३७८ हेक्टर शेतजमीन लागणार असल्याने ती जमीन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी तेलंगणा सरकारला हा प्रकल्प तेलंगणा राज्यातच नव्हे, तर संपूर्ण भारत देशात कौतुकाचा विषय करण्याची महत्त्वाकांक्षा लागली होती. त्यासाठी हा प्रकल्प दोन ते तीन वर्षांत उभा करण्यात आला. -    भूसंपादनाकरिता महाराष्ट्र राज्याकडील शेतजमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्यानुसार देताना जर पीडित शेतकरी समाधानी नसतील तर तेलंगणा सरकार पूर्णपणे थेट खरेदी करणार, असेही ठरले होते. त्यासाठी तेलंगणा सरकारने एकरी १०.५० लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडे दिले. -    परंतु, ३७३.८० हेक्टर जमिनीपैकी केवळ २३४.९१ हेक्टर शेतजमीनच तेलंगणा सरकारने खरेदी केली. बाकीच्या १३८.९१ हेक्टर शेतजमिनीच्या मंजूर झालेला भूसंपादनांतर्गत प्रक्रिया स्थगित करून भूसंपादन प्रक्रियेसाठी पीडित शेतकऱ्यांना झुलविले जात आहे.

मेडिगड्डा प्रकल्पामुळे तीन वर्षांपासून मंजूर    झालेल्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित ठेवली. ही प्रक्रिया २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार न करता सरळ, थेट खरेदी-विक्रीप्रमाणे करून एकरी २० लाख रुपये मोबदला देण्यात यावा.- रामप्रसाद शंकर रंगुवार, शेतकरी, आरडा

मेडिगड्डा प्रकल्पाच्या विसर्गामुळे खालच्या भागातील आसरअल्ली, अंकिसा, बालमुत्यमपल्ली, पोचमपल्ली व इतर गावांतील शेकडो हेक्टर शेतजमीन नष्ट होऊन गोदावरी नदीच्या पात्रात जात आहे. आतापर्यंत किती जमीन पात्रात गेली, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे आणि पीडित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. तसेच मेडीगड्डाच्या खालच्या भागात संरक्षक भिंत उभारली पाहिजे.- चंद्रशेखर पुलगम, सामाजिक कार्यकर्ते, आसरअल्ली

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प