शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात सुविधांची ऐसीतैसी! रुग्णांवर नाक दाबून उपचार घेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:06 IST

छताला गळती, खाटाखालूनही वाहतेय पाणी

गडचिरोली : कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांनी चर्चेत असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या रुग्णांवर नाक दाबून उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्याला कारण आहे स्वच्छतागृहात साचलेली घाण व अस्वच्छता. छताला गळती लागली असून, खाटाखालूनही पाणी वाहत आहे. त्यामुळे रुग्णांमधून रोष व्यक्त होत आहे.

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांच्या काळात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन साहित्य खरेदी तसेच विकासकामे करण्यात आली, परंतु ती वादात अडकली आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासकामांचा दावा खोडून काढत जिल्हा रुग्णालयात तीनशे कोटींपर्यंत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. अशातच आता जिल्हा रुग्णालयातील विदारक परिस्थिती समोर आली आहे. वॉर्डात छतातून पाणी ठिबकत असून, काही ठिकाणी विद्युतपुरवठा करणारे वायर उघडे आहेत. शौचालयात घाणच घाण पसरली आहे. काही ठिकाणी पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. सध्या जलजन्य आजारांनी डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढलेली आहे, पण सामान्य व गरजू रुग्णांची उपचार घेताना परवड होत असल्याचे चित्र आहे.

अधिकाऱ्यांच्या दालनावर उधळपट्टी, वॉर्डात असुविधा

दरम्यान, वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचे उद्घाटन केले होते. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षातही लाखोंची उधळपट्टी करून अत्याधुनिकीकरण केले होते. मात्र, उर्वरित वाॅर्डांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे.

वॉर्डांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. काम वेगाने करून असुविधा दूर करावी यासाठी बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. कामे दर्जेदार करावीत, अशी विनंती केली आहे. असुविधा दूर करून रुग्णांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलGadchiroliगडचिरोली