गडचिरोली : ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीजबिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाइल अॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. राज्यात ७० टक्केहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे.
तुम्हीही व्हाल लकी डिजिटल ग्राहक सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.
योजना कुणासाठी, कालावधी काय? १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीज बिल भरावा लागेल.
प्रत्येक महिन्यात एक लकी ड्रॉ महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एकप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येणार आहेत. लकी ड्रॉ साठी पात्र ठरण्यासाठी किमान वीज बिल १०० रूपये असणे आवश्यक आहे.
स्मार्ट फोन किंवा स्मार्ट वॉच मिळणार प्रत्येक लकी ड्रामध्ये प्रत्येक उपविभागानिहाय पाच विजेत्यांची निवड केली जाणार आहे. त्या विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
थकबाकीदार ग्राहक ठरणार अपात्र थकबाकी ठेवणारे ग्राहक या योजनेस पात्र असणार नाहीत. ही योजना गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथदिवे ग्राहकांकरिता नाही.