शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

साडी व गाडीपेक्षा पाल्याकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:46 IST

अनिष्ठ रूढींनी पिचलेल्या तेली समाजाला समाज परिवर्तनाची आवश्यकता आहे. साडी व गाडीची जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी आपल्या मुलांची घेऊन त्यांना घडविले तर सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देविजय गवळी यांचे प्रतिपादन : संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त चामोर्शीत समाज प्रबोधन मेळावा व कीर्तन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : अनिष्ठ रूढींनी पिचलेल्या तेली समाजाला समाज परिवर्तनाची आवश्यकता आहे. साडी व गाडीची जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी आपल्या मुलांची घेऊन त्यांना घडविले तर सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होईल. संत जगनाडे महाराजांनी सुरू केलेले समाज प्रबोधनाचे कार्य सतत चालू ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन औरंगाबदचे विचारवंत विजय गवळी यांनी केले.संताजी स्नेही मंडळच्या वतीने चामोर्शी येथे सोमवारी संत जगनाडे महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी संतांजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी होते. कार्यक्रमापूर्वी तेली समाजातील युवक, युवतींनी दुचाकी रॅली काढली. पुढे मार्गदर्शन करताना विजय गवळी म्हणाले, झाडाचे मूळ खडकाला तोडून आत जाते व झाड बहरते. तसे विचार समाजाच्या अंतकरणापर्यंत गेले पाहिते. महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श मानणाºया समाजाने त्यांचे विचार अंगिकारले पाहिजे. महामानव जन्मत नसतात. तर ते घडविले जातात. जीजाऊने शिवरायांना घडविले. आजचे पप्पा फेसबुकवर, मम्मी वॉट्सअ‍ॅपवर व मुलगा टिष्ट्वटरवर असेल तर काय समाज प्रबोधन होणार, आईवडिलांनी सर्वप्रथम शहाजी व जीजाऊ व्हावे, मगच शिवाजी घडतो. संत तुकाराम महाराजांची बुडालेली गाथा पुन्हा लिहून काढायची जबाबदारी संत जगनाडे महाराजांनी घेतली. म्हणून तुकाराम महाराज आपणास माहित आहेत. ४०० वर्षांपूर्वी हातात लेखणी घेतलेले संत जगनाडे महाराज हे एकमेव संत होते. संत तुकाराम महाराज कुणबी व संत जगनाडे महाराज तेली समाजाचे होते. दोन्ही संतांची कार्य सारखीच आहेत. त्यामुळे तेली व कुणबी समाजाने एकत्र यावे.संत जगनाडे महाराजांना समजून घ्यायचे असेल तर संत तुकाराम महाराजांना समजून घ्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक वृत्तपत्रात तुकाराम महाराजांचा अभंग असायचा. शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी तुकाराम महाराजांनी दिली. मुहूर्त पाहिला असता तर शिवाजी घडलेच नसते. कोणतीही दिशा अपशकुनी राहत नाही. दारूचे दुकान कोणत्याही दिशेला असो, ते चालते. तर इतर दुकाने का चालू नये, असा प्रश्न गवळी यांनी उपस्थित केला.प्रास्ताविक राहुल नैताम, संचालन सीमा खोबे तर आभार दिलीप चलाख यानी मानले. कार्यक्रमाला पाच हजारा पेक्षा अधिक तेली समाजबांधव उपस्थित होते.रंजले व गांजलेल्यांच्या सेवेतच खरा देव प्राप्त होतो- प्रा. देवानंद कामडीदेवाला नवस व पैशाची गरज नाही. सरळ देवाची आराधना करा, पैशाचा व्यवहार करणाºयांशी संबंध ठेवू नका, देव केवळ भावाचा भुकेला आहे. देव दगडात नाही व मंदिरातही नाही. रंजल्या, गांजलेल्यांच्या सेवेतच खरा देव आहे. ही संतांनी दिलेली शिकवण आहे. पोटाला भूख लागते तेव्हा अन्नाची गरज असते. मेंदूलाही भूक लागते, तेव्हा ज्ञानाची गरज असते, ज्ञान समाजप्रबोधनातून मिळते. समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून ज्ञान घेऊन जा, मुले ही आपली संपत्ती आहे, त्यानंतर राष्ट्राची संपत्ती होईल. त्यामुळे मुलांना चांगले घडविण्यात कधीच कसर सोडू नये. मुलांसाठी संपत्ती कमावून ठेवण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करा, असे मार्गदर्शन प्रा. देवानंद कामडी यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.मृत्यूनंतर गावजेवण काय कामाचे?आईवडिलांची सेवा करीत असलेल्या पुंडलिकाच्या भेटीला स्वत: विठ्ठल आले. तशी सेवा आपणही करा, मंदिरात जाण्याची गरज नाही. आईवडील असेपर्यंत त्यांना जेवायला दिले जात नाही. मृत्यूनंतर मात्र गावजेवण दिले जाते. असा पोरगा नसला तरी चालेल, असा विचार संतांनी मांडला. आईवडील हेच आपले देव आहेत. हिंस्त्र प्राण्याला वळण लागू शकते, तर आपल्या पोराला वळण का लागू शकत नाही, असा प्रश्न विजय गवळी यांनी उपस्थित केला. शिक्षणाची कास धरून विकासाच्या मार्गावर चालले पाहिजे. तरच समाजाचा विकास होईल, असे प्रबोधन त्यांनी केले.