लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंदनाची शेती करून शेतकºयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विकास संस्था आरमोरीचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकरी मित्रांकरीता नवी दिशा चंदन लागवडीबाबत मार्गदर्शन व रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून हरित मित्र परिवार पुणेचे संस्थापक महेंद्र घागरे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एटबॉन, उपवनसंरक्षक एस. बी. फुले, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आदी उपस्थित होते.प्रास्ताविकातून मार्गदर्शन करताना प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने राज्यात आपल्या नियोजित व अत्याधुनिक प्रणालीद्वारे एक वेगळी छाप सोडली आहे. आता त्यामध्ये सामाजिक कार्याची भर पडली आहे. जिल्ह्यातील शेतकरी फक्त एका विशिष्ट पिकाद्वारे सक्षम होवू शकणार नाही. त्याकरीता अत्याधुनिक व जास्तीत जास्त नफा मिळणाºया शेतीकडे शेतकºयांना वळण्याची अत्यंत गरज आहे. त्याकरीता बँकेकडून या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.मार्गदर्शन करताना नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान म्हणाले, शेतकºयांना वनविभागातर्फे कोणत्याही अडचणी येवू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी भगवान यांनी दिली. मार्गदर्शक म्हणून घागरे म्हणाले, चंदनाचे वृक्ष हे अधिक उत्पन्न देणारे वृक्ष आहे. मात्र या वृक्षाला संगोपनाची व संरक्षणाची फार गरज आहे. त्याकरीता झाडाला एका विशिष्ट पद्धतीने लावण्याची गरज आहे. चंदनाचे वृक्ष हे पाच झाडांमागे एक झाड निश्चितपणे जगतो. १०० वर्षानंतर त्याचे उत्पन्न १ कोटी असते. चंदनाच्या वृक्षामुळे विविध प्रकारचे आजार नाहीसे होतात. वृक्षाच्या सुगंधामुळे रागीष्टपणा दूर होतो, असेही घागरे यांनी सांगितले.अरविंद पोरेड्डीवार पुढे म्हणाले, ज्याप्रकारे या सागवानाचे येथील शेतकºयांनी संरक्षण केले आहे, त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडांचेही संरक्षण करण्यात शेतकरी मागे पडणार नाही, असा आशावाद अरविंद पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला. रवी गावात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वामन मरस्कोल्हे यांच्या कुटुंबीयांना बँकेतर्फे ११ हजार रूपयांंचा धनादेश देण्यात आला.
नगदी पिके घेण्याकडे भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:53 IST
चंदनाची शेती करून शेतकºयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विकास संस्था आरमोरीचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.
नगदी पिके घेण्याकडे भर द्या
ठळक मुद्देअरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : जिल्हा सहकारी बँकेत चंदनाच्या शेतीबाबत मार्गदर्शन