शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

१३० च्या वर रूग्ण आकडा पोहोचला

By admin | Updated: November 18, 2015 01:27 IST

संपूर्ण कोरची तालुक्यात हिवतापाचा प्रकोप सुरु असून, मंगळवारी आणखी ३५ रुग्णांची भर पडल्याने हिवताप पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा १३० च्या वर पोहचला आहे.

मलेरियाचा प्रकोप कायम : एकाच डॉक्टरवर भार; रूग्णालयात रूग्णांची प्रचंड गर्दीकोरची : संपूर्ण कोरची तालुक्यात हिवतापाचा प्रकोप सुरु असून, मंगळवारी आणखी ३५ रुग्णांची भर पडल्याने हिवताप पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा १३० च्या वर पोहचला आहे. सर्वत्र भयावह परिस्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन व हिवताप विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.कोरची तालुक्यातील दीडशेहून अधिक नागरिक हिवतापाने फणफणत असून, तब्बल १३५ रुग्णांना हिवतापाची लागण झाली आहे. मात्र जिल्हा स्थळावरुन डॉक्टरांची चमू पाठविण्यात न आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात एकतरी रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. या गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेणे गरजेचे असताना प्रशासनाने मात्र त्याकडे अक्षम्य कानाडोळा केला आहे. आमदार क्रिष्णा गजबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी न घेतल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.३० खाटांची व्यवस्था असलेल्या या रूग्णालयात अनेक रूग्ण खाली झोपून उपचार घेत आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज मलेरिया रूग्ण येथे येऊन दाखल होत आहेत. मात्र या रूग्णालयात डॉ. येळणे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)