लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने औषधोपचारासाठी आलेले अनेक रुग्ण आल्या पावली घरी परतले. या संतापजनक प्रकारामुळे आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.मुलचेराच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विरेंद्र खांडेकर हे रजेवर गेल्याने येथील बाह्य रुग्णविभाग डॉ. धम्मदीप धाकडे सांभाळत होते. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. धाकडे यांची प्रकृती बिघडल्याने ते गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात गैरहजर असल्याचे उपस्थित कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने २२ व २३ आॅगस्टला ३१ बाह्य सामान्य रुग्णांवर अधिपरिचारिकामार्फत औषधोपचार करण्यात आला. उर्वरित रुग्ण औषधोपचाराविना आल्यापावली घरी परतले. आंतर रुग्ण विभागात सात महिला व एक पुरूष रुग्ण भरती असून त्यांची दोन दिवसांपासून तपासणी झाली नसल्याची माहिती आहे. सदर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाºयांची एकूण २३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १५ पदे भरण्यात आाले असून अद्यापही ११ पदे रिक्त आहेत. दीड वर्षापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी येथील सर्व रिक्तपदे तत्काळ भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वेळेनुसार त्यांचे आश्वासन हवेत विरले.ग्रामीण रुग्णालयातील महत्त्वाचे पद म्हणजे वैद्यकीय अधीक्षक हे आहे. मात्र ते सुद्धा प्रतिनियुक्तीवर आहेत. डॉ. खांडेकर हे येथे दिवस-रात्र सेवा देत आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेश कोटवार यांची या रुग्णालयात पदस्थापना करण्यात आली होती. मात्र त्यांना सुद्धा धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत मंगळवारी येथे तीन गरोदर महिलांची प्रसूती झाली. येथे वैद्यकीय अधीक्षक व दोेन वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्तपदे तत्काळ भरण्याची गज आहे. मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.डॉक्टर नसल्याने येथील बरेचसे रुग्ण औषधोपचाराअभावी आल्यापावली घरी परतल्याची माहिती मिळताच भाजपचे मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता यांनी लागलीच रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात जाऊन रुग्णांची विचारपूस केली त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. प्रशासनाने मुलचेराच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांची पदे तत्काळ न भरल्यास भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.मुलचेराच्या ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे येथील रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत आपण जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती दिली. येथील डॉक्टर रजेवरून परत येईपर्यंत येथे दुसºया डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.- मनीष अतकरी, सहायक अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुलचेरा
डॉक्टरांअभावी रुग्ण परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:20 IST
येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने .....
डॉक्टरांअभावी रुग्ण परतले घरी
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयातील प्रकार : दोन दिवसांपासून मुलचेराचे सरकारी रुग्णालय डॉक्टरांविना