शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पुलामुळे बसला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे.

ठळक मुद्देगडअहेरी नाल्याला भेट; परिसराच्या १२ गावातील संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयाजवळ असलेल्या गडअहेरी नाल्यातून भरपूर पाणी वाहत असल्याने परिसराच्या १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. गडअहेरी येथील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. यावर्षीही त्याचा फटका बसला.आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसराच्या १० ते १२ गावातील संपर्क तुटला आहे. ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडअहेरी नाल्यावर भेट देऊन माहिती जाणून घेतली.गडअहेरी नाल्यासह परिसरातील नाल्यांना पूर आल्याने या भागातील आवागमन बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर परिस्थितीमुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाता येत नाही.कमी उंचीच्या पुलामुळे नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पुलाचे काम झाल्याशिवाय समस्या दूर होणार नाही. या सर्व गंभीर समस्यांची माहिती जि. प. अध्यक्षांनी याप्रसंगी घेतली. यावेळी अहेरी येथील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरRainपाऊस