शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:30 IST

तोंडाजवळ आलेला हातातला घास कुणी हिसकावून न्यावा, अगदी तशीच अवस्था जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जड व मध्यम प्रतीचे धानपीक पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील पीक

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : तोंडाजवळ आलेला हातातला घास कुणी हिसकावून न्यावा, अगदी तशीच अवस्था जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जड व मध्यम प्रतीचे धानपीक पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेला पाऊस झाला. हा दिवस वगळता संपूर्ण म्हिना कोरडा गेला. त्यामुळे येथील शेतातल्या धानाला सिंचन सुविधा होऊ शकली नाही परिणामी धान करपले. धान करपल्याने बळीराजा नि:शब्द असून सरकारने मदत देण्याची मागणी विहीरगावच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी बांधव धानपिकाची रास येईपर्यंतच्या संपूर्ण खर्चाचा हिशोब करून आधीच जुळवाजुळव करण्याचा जिवतोड प्रयत्न करतो. त्यासाठी मागील हंगामातील धान विकणे, रब्बी पीक विकणे, बँकेचे कर्ज अशा पद्धतीने पैसे उभारून पेरणी पूर्व मशागत, सेंद्रिय खत टाकणे, नांगरणी, बी-बियाणे खरेदी, पेरणी, रासायनिक खत टाकणे, चिखलणी, मजुरांची तजवीज, रोवणी, पुन्हा कीटकनाशक फवारणी, निंदण करीत असतो. या दरम्यान पाऊस नसल्यास पाण्यासाठी कृषिपंप, डिझेल इंजिनची व्यवस्था करणे, कापणी, बांधणी, मळणी यंत्र शोधून मळणी करणे आणि अखेर धान रास घरी आणणे.यासर्व प्रक्रियेतून गेल्यावर धानपीक हातात येते. मात्र या टप्प्यात पावसाने दडी मारल्यास, अतिवृष्टीने बुडाल्यास, रोगाने पीक नष्ट झाल्यास धानावर केलेला हजारो रुपयांचा खर्च तोट्यात जातो. अगदी हीच परिस्थिती तालुक्यातील पूर्वेकडील विहीरगाव व परिसरात दिूसन येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने योग्य साथ दिली. त्यामुळे धान जोमात होता परंतु पूर्ण सप्टेंबर महिन्यात २० तारखेचा उत्तरा नक्षत्राचा पाऊस वगळल्यास सप्टेंबर महिना पावसाविना गेला. याचा प्रतिकूल परिणाम धानावर झाला.देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुविधा न होऊ शकल्याने हजारो रुपये खर्चून जपलेले धानपीक डोळ्यादेखत करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी विहीरगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस