शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत धानघोटाळा भोवला, ४१ गिरणीमालकांना दोन कोटींचा दंड; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

By संजय तिपाले | Updated: December 18, 2023 15:56 IST

आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड

गडचिरोली : धान भरडाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या गिरणीमालकांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दणका दिला आहे. अनियमिमतता व गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेऊन ४१ गिरणीमालकांकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत. 

आधारभूत खरेदी योजनेत आर्थिक गैरव्यवहार करुन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय  यांनी चौकशी समिती नेमून ४१ राईस मिल मालकांकडे उपलब्ध दस्तऐवजांची तपासणी केली होती. त्यावेळी या राईस मिल मालकांनी संगनमत करुन गंभीर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित राईस मिल मालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शिवाय या प्रकरणी गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापक गजानन कोटलावार या निलंबितही केलेले आहे. यानंतरपाच गिरण्या काळ्या यादीत टाकल्या आहेत.

तथापि, अनियमितता व गैरव्यवहाराचा ठपका ठेऊन ४१ गिरणीमालकांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागविला होता. मात्र, पुराव्यादाखल गिरणीमालकांना कोणेतेही दस्तऐवज सादर करता आले नाही. हा खुलासा असमाधानकारक असल्याचा निर्वाळा देत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी विहित शासन निर्देशानुसार दंड वसूल करण्याचे आदेश दिले. एकूण २ कोटी ६  लाख ७० हजार ५२४ रुपये एवढी दंडाची रक्कम आहे. हा दंड एकरकमी वसूल करण्यात येणार आहे. या प्रकरणात आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बन्सोड यांनी फौजदारी कारवाईचे निर्देश दिलेले  आहेत. मात्र, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार व गिरणीमालकांवर अद्याप फौजदारी कारवाई झालेली नाही. त्यामुळे दंड ठोठावला, पण फौजदारी कारवाई कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

स्वयंघोषित काँग्रेस नेता तोंडघशी

दरम्यान, धान घोटाळा दडपण्यासाठी देसाईगंजातील एका स्वयंघोषित नेत्याने आटापिटा केला होता. निलंबित अधिकाऱ्याला सोबत घेऊन मंत्रालयात तसेच मंत्र्यांकडे उंबरे झिजविले होते, आपण हायकमांडचे खास आहोत, असे सांगून त्याने इतर गिरणीमालकांकडूही 'वसुली' केली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांना न जुमानता दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे हा स्वयंघोषित नेता तोंडघशी पडला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली