शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी क्षेत्रात धान खरेदी वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:14 IST

शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी ऐन हंगामाच्या तोंडावर आपल्या मागण्या उचलून धरल्या आहेत.

ठळक मुद्देजुने कमिशन बाकी : संस्थांनी दाबले आदिवासी विकास महामंडळाचे नाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी ऐन हंगामाच्या तोंडावर आपल्या मागण्या उचलून धरल्या आहेत. प्रलंबित असलेल्या जुन्या कमिशनसह इतर मागण्या मान्य न केल्यास धान खरेदीच करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने यावर्षी आदिवासीबहुल क्षेत्रात धान खरेदी वांद्यात येणार आहे.धानाचे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच हलका धान कापणीवर येतो. त्यामुळे दसºयानंतर शासनाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात.तत्पूर्वी आदिवासीबहुल क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने ठिकठिकाणच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था आणि सर्वसाधारण क्षेत्रात मार्केटिंग फेडरेशनमार्फत धान खरेदी केंद्र उघडण्यासाठी करार केले जातात. मात्र यावर्षी आदिवासी वि.का.संस्थांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी ताठर भूमिका घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.या संस्थांचे २०१५-१६ चे कमिशन प्रलंबित आहे. ५ रुपये क्विंटल याप्रमाणे कोट्यवधी रुपयांचे कमिशन बाकी संस्थांना मिळालेले नाही. याशिवाय २०१७-१८ चे कमिशनही मिळणे बाकी आहे. याचा फटका सदर संस्थांना सहन करावा लागत आहे. तसेच धानातील अधिकच्या तुटीचेही खापर या संस्थांवर फोडले जात आहे. त्यामुळे यावर्षी केंद्र सुरू करण्यापूर्वी मागील हंगामातील फाटक्या बारदाण्याची उचल करावी अशीही संस्थांची मागणी आहे. तसेच खरेदी केलेले धान दोन महिन्यात उचल करण्याची हमी द्यावी अशी मागणी सदर संस्थांनी आदिवासी विकास महामंडळाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.ऐन धान खरेदीचा हंगाम सुरू होताना संस्थांनी आपल्या मागण्यांसाठी ही ताठर भूमिका घेऊन आदिवासी विकास महामंडळ आणि राज्य सरकारचे नाक दाबले आहे. आता यावर तातडीने तोडगा न निघाल्यास पुन्हा शेतकºयांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड