शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांसाठी झाली साेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:00 AM

दवंडी येथे आविका संस्थेचे सभापती सिमूजी ताडाम यांच्या हस्ते धान खरेदी केेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.  याप्रसंगी उपसभापती सदाशिव सहारे, संचालक नरेश  टेंभूर्णे, दिनेश सेलाेकर, तुकाराम दुर्गे, भाऊराव भाेयर, आत्माराम काळे, व्ही.आर.मडकाम, व्यवस्थापक व्ही.व्ही.वऱ्हाडे, वाय.के.गावतुरे, श्यामराव आतला, स्वप्नील ताडाम यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. भाकराेंडी ते पिसेवडधा परिसरातील शेतकऱ्यांची धान विकण्याची साेय या केंद्रामुळे  झाली आहे.

ठळक मुद्देअहेरी व आलापल्लीत शुभारंभ : आधारभूत याेजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी विकास महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत अहेरी व आलापल्ली येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम उपस्थित होते. यावेळी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून धानाची विक्री करावी. कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे, असे आवाहन  आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी केले.धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आविका संस्थेचे अध्यक्ष क्रिष्किंद्ररावबाबा आत्राम, उपाध्यक्ष बाबुराव जक्कोजवार, विपणन सहाय्यक दामोदर जुगनाके, ग्रेडर अनंतकुमार आलाम, माजी सरपंच गंगाराम कोडापे,  सचिव राजेंद्र गौरकार तसेच आलापल्ली येथे भीमय्या साइनवार, अचूबाई सडमेक, ईश्वर वेलादी, माजी उपसरपंच मलय्या तोटावार, सचिव कोमले, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, पुनशे, तलांडे, बशीर शेख, सुरेश कोरेत, बाबुराव जुनघरे, आदित्य जक्कोजवार, शुभम चिंतावार यांच्यासह दाेन्ही ठिकाणाचे शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित होते.

काेरेगाव व दवंडी येथे धान खरेदीचा शुभारंभ

काेरेगाव/चाेप/मानापूर/देलनवाडी : महाराष्ट्र स्टेट काे-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने काेरेगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आरमाेरी तालुक्याच्या दवंडी (खडकी) येथे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी साेसायटीच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. काेरेगाव येथील उद्घाटनप्रसंगी देसाईगंज सहकारी खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष अण्णाजी तुपट, परसराम टिकले, दिनेश कुर्जेकर, तुकाराम तितीरमारे, सचिव पुंडलिक तलमलेे, आबाजी राऊत, ज्ञानेश्वर बुल्ले, पुरूषाेत्तम गायकवाड, अरूण गायकवाड, नानाजी मुंडले, कृष्णा पुस्ताेडे व शेतकरी उपस्थित हाेते. या धान केंद्रावर १ हजार ७८० शेतकऱ्यांनी धानविक्रीसाठी टाेकण  घेतले असून आधारभूत हमीभाव ‘अ’ ग्रेटचे धान  १ हजार ८८८ रुपये व  ‘ब’ ग्रेडचे धान १ हजार ८६८ रुपयांच्या हमीभावाने खरेदी केले जाणार आहे. महाआघाडी  सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. दवंडी येथे आविका संस्थेचे सभापती सिमूजी ताडाम यांच्या हस्ते धान खरेदी केेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.  याप्रसंगी उपसभापती सदाशिव सहारे, संचालक नरेश  टेंभूर्णे, दिनेश सेलाेकर, तुकाराम दुर्गे, भाऊराव भाेयर, आत्माराम काळे, व्ही.आर.मडकाम, व्यवस्थापक व्ही.व्ही.वऱ्हाडे, वाय.के.गावतुरे, श्यामराव आतला, स्वप्नील ताडाम यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. भाकराेंडी ते पिसेवडधा परिसरातील शेतकऱ्यांची धान विकण्याची साेय या केंद्रामुळे  झाली आहे. येथे टाेकन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. 

पिंपळगावात धान खरेदी केंद्र सुरूदेसाईगंज : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पिंपळगाव येथे ०२ डिसेंबर रोजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती कृष्णा भाेयर, उपसभापती आर.एस.कुमरे, सदस्य के.टी.राऊत, बी.एस.भाेयर, वाय.एम.घरत, एम.एम.प्रधान, एस.गायकवाड यांच्यासह आविका संस्थेचे कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित हाेते. आ.कृष्णा गजबे यांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शासन व प्रशासनाकडे केली हाेती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड