शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ तालुक्यांत होणार प्राणवायू निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

जिल्ह्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गडचिरोली शहरातील दोन प्रमुख सरकारी रुग्णालयांसह इतर ८ तालुका मुख्यालयी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याबाबतची चाचपणी आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यासाठी निधी देण्याची इच्छा व्यक्त केली.

ठळक मुद्देचाचपणी सुरू, रुग्णांसाठी ठरणार जीवनदायी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या प्रकोपाने त्रस्त झालेल्या रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) मिळत नसल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे. याच समस्येतून अनेकांना प्राणही गमवावे लागले. जिल्ह्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गडचिरोली शहरातील दोन प्रमुख सरकारी रुग्णालयांसह इतर ८ तालुका मुख्यालयी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याबाबतची चाचपणी आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यासाठी निधी देण्याची इच्छा व्यक्त केली.जिल्ह्यात एकूण १० ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील पाच प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाणार असून, त्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे.अशा पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जिल्ह्यात कुठेही कार्यरत नसून, कुठे किती क्षमतेचे प्रकल्प उभारले जाऊ शकतात याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान संचालनालयाकडे पाठविली. 

मिनिटाला १८१ ते १२०० लिटर ऑक्सिजन निर्मितीहवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रकल्पाची क्षमता वेगवेगळी राहणार आहे. देसाईगंज, कोरची, चामोर्शी, एटापल्ली आणि सिरोंचा येथे प्रतिमिनिट १८१ लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असणारे युनिट लागणार आहे. अहेरी, आरमोरी आणि कुरखेडा येथे प्रतिमिनिट ३४० लिटर ऑक्सिजन निर्मिती, तर जिल्हा महिला रुग्णालयात ६११ लिटर प्रतिमिनिट आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात १२०० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असणारे युनिट लागणार आहे.

स्थायी सुविधा मिळणारऑक्सिजन निमिर्तीचे हे प्रकल्प केवळ काेराेना काळातच नाही तर भविष्यातही विविध आजारांच्या गरजवंत रुग्णांसाठी उपयाेगाचे ठरणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आराेग्यविषयक सुविधांची कमतरता आहे. ऑक्सिजनच्या प्रकल्पामुळे ही एक स्थायी सुविधा हाेणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन