लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मंगळवारी जिल्ह्यात एकाच दिवशी ६९ काेराेना रुग्णांची भर पडली आहे, ३० जणांनी काेराेनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या १० हजार २३३ एवढी झाली आहे. एकूण ९ हजार ७८४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ३४१ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३.३३ टक्के तर मृत्यू दर १.०६ टक्के झाला. नवीन ६९ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २७, अहेरी ५, आरमोरी ८, भामरागड तालुक्यातील ६, चामोर्शी ९, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली १, तर वडसा तालुक्यातील १२ जणांचा समावेश आहे.गडचिरोली तालुक्यातील बाधितांमध्ये गोंडवाना विद्यापीठाजवळ १, रामनगर ३, कॅम्प एरिया ३, विसापूर १, गोकुळनगर १, सर्वोदय वाॅर्ड १, बसस्टॉपच्या मागे धानोरा रोड १, इंदाळा १, वैनगंगानगर एमआयडीसी रोड १, रेड्डी गोडाऊन १, कलेक्टर कॉलनी १, आशीर्वाद नगर २, बालाजीनगर १, स्थानिक १, एसपी मुनघाटे हायस्कूल १, नंदनवन १, अहेरी तालुक्यातील धरमपूर १, गीताली १, स्थानिक २, आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील वघाडा १, स्थानिक ५, वैरागड २, भामरागड तालुक्यातील लाेकबिरादरी प्रकल्प हेमलकसा ५, टेकाला १, चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा १, स्थानिक ५, मारोडा २, चाकलपेठ १, धानोरा तालुक्यातील गोडलवाही १, एटापल्ली तालुक्यातील स्थानिक १ तर देसाईगंज तालुक्यातील गांधी वाॅर्ड २, सिंधी कॉलनी १, आंबेडकर विद्यालय ५, विसोरा १, कस्तुरबा वाॅर्ड १, स्थानिक १ तर इतर जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे.
६९ काेराेना रुग्णांची एकाच दिवशी भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST