शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

वाहन उलटून १८ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 6:00 AM

गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ककोडी येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी २३ जनावरे टीएस-३१-टीओ-७०३ या क्रमांकाच्या सहाचाकी कंटेनर ट्रकमध्ये कोंबून नेली जात होती. दरम्यान भीमपूर नाल्याच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात १८ जनावरे जागीच ठार झाले तर जीवंत पाच पैकी दोन जनावरे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकत्तलीसाठी हैदराबादकडे जात होती : भीमपूर नाल्याच्या वळणावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कत्तलीसाठी हैदराबाद येथे जनावरे नेणारे वाहन उलटल्याने या अपघातात १८ जनावरे जागीच ठार तर दोन जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोरचीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या भीमपूर नाल्याच्या वळणावर घडली.गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ककोडी येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी २३ जनावरे टीएस-३१-टीओ-७०३ या क्रमांकाच्या सहाचाकी कंटेनर ट्रकमध्ये कोंबून नेली जात होती. दरम्यान भीमपूर नाल्याच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात १८ जनावरे जागीच ठार झाले तर जीवंत पाच पैकी दोन जनावरे गंभीर जखमी झाले. सदर बैलाचे मालक व व्यापारी नागपूर येथील असल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात कोरची पोलीस ठाण्यात वाहनचालक फारूख शेख, नासिर शेख रा.बल्लारपूर (चंद्रपूर) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे सोबत असलेले दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यांच्या विरोधातही कोरची पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर रोजी भादंविचे कलम २७९, ४२७, ९, ११, ५ (अ) (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.इमरान शेख रा.गडचांदूर असे वाहन मालकाचे नाव आहे. भीमपूर गावाजवळ विरूद्ध दिशेने येत असलेल्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडखाली उतरून शेतशिवारात घुसला.अपघात झाल्याचे कळताच कोरचीच्या पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळ गाठले. जखमी झालेल्या ट्रकचालक व वाहकाला त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वाहनामध्ये मृत पावलेल्या जनावरांना जेसीबीच्या सहाय्याने व लोकांच्या मदतीने ट्रकच्या बाहेर काढण्यात आले.मृत जनावरांचे भीमपूर जंगल परिसरात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेवगडे, डॉ.खंडाते, डॉ.गावित, डॉ.दुधकुवर यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली. जखमी असलेल्या जनावरावर औषधोपचार करून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले करीत आहेत.यापूर्वीही ट्रक फसल्याने २५ जनावरे बचावलीयापूर्वी कोरची तालुक्यातून ट्रकमधून २५ जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू होती. सदर ट्रक गुप्तेकसा गावाजवळ फसला. त्यावेळी लोकांनी पुढाकार घेऊन येथील जनावरे पकडली व त्यांची सुटका केली. याशिवाय कोरची येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बोरी येथील अवैध कत्तीसाठी जाणाऱ्या जनावरांना सापळा रचून जनावरांनी भरलेले दोन ट्रक पकडले होते. या दोन्ही प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही.२५ ठाण्यांची हद्द पार करून जनावरांची तस्करीकोरची तालुक्यातील बोरी, घुगवा, बोटेकसा, कोटरा तसेच कोरची पोलीस ठाण्याच्या सीमेलगत असलेल्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकोडी, चिपोटा, मांगाटोला हे नागपूर येथील कसायांचे माहेरघर आहे. दररोज एक ते दोन ट्रक भरून येथून जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या तीन जिल्ह्यातील २५ पेक्षा अधिक पोलीस स्टेशनची हद्द ओलांडून जनावरे हैदराबादपर्यंत नेली जातात.आम्ही हजार रुपये मजुरीने शेख या जनावर तस्कराकडे काम करतो, मिसपिरीवरून जनावरे वाहनात टाकून कोरची, कुरखेडा, देसाईगंज, नागभिड, सिंदेवाही, मूल, चंद्रपूर ते आंध्रप्रदेशाच्या सीमेपर्यंत नेऊन देण्याचे काम आमच्याकडे आहे, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनचालकाने पोलिसांना सांगितले. आंध्रप्रदेशाच्या सीमेवरून दुसºया वाहनाच्या सहाय्याने जनावरे हैदराबादला नेले जातात, अशी माहिती त्याने पोलिसांनी दिली.कोरची तालुक्यातून दुवा, बोरी, कोटगूल तसेच गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड तसेच छत्तीसगडमधील दिसपूर येथून अवैधरित्या नागपूर तसेच हैदराबादकडे कत्तलीसाठी पाळीव जनावरांची तस्करी केली जाते. शेकडो गायी, बैल कसायाच्या तावडीत सापडत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात