शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सर्दी, डोकेदुखीवर घेता येणार ऑनलाइन सल्ला ; ई संजीवनी योजनेच्या माध्यमातून गरजूंना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:39 IST

Gadchiroli : शहरी भागात १३ रुग्णालये सेवेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध कारणांमुळे अलिकडे प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डोकेदुखी, मळमळ, सर्दी, उलटी किंवा पोटदुखी आदी त्रास जाणवत असेल. तर ई-संजीवनी योजनेअंतर्गत ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी मोफत सल्ला मिळतो. जिल्ह्यात मागील वर्षभरात जवळपास २ हजारवर रुग्णांनी ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी डॉक्टरांचा मोफत सल्ला घेतला आहे.

राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून कोविड काळापासून ही ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू झाली. यासाठी वेबसाइट किंवा अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. या पोर्टलवर किंवा अॅपचा उपयोग करून ऑनलाइन उपलब्ध डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओद्वारे सल्लामसलत करून रुग्ण विनामूल्य सल्ला घेऊ शकतात.

गडचिरोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात विविध रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर सेवेत कार्यरत आहेत. या डॉक्टरांची सेवा ऑनलाइनरित्या मिळते. ऑनलाइन सल्ला मिळाल्यानंतर औषधोपचार केला जातो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या विभागाची मिळते रूग्णांना सेवाई- संजीवनी ओपीडी मार्फत दंतरोग, त्वचा रोग, शल्यचिकित्सा, मानसिक रोग, मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग, नेत्रचिकित्सा, अस्थिरोग आदी तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी सुविधा दररोज सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी १.४५ ते ५ वाजेपर्यंत सुरू असते. या वेळेत ऑनलाईन सल्ला मिळतो.

नोंदणी कशी करणार ?मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवरून ई-सजीवनी अॅप डाउनलोड करा, हे अॅप वापरण्यासाठी फोन नंबर लागेल, यामध्ये लॉगिनसाठी काही महत्त्वाची माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेशंट रजिस्ट्रेशन / जनरेट टोकन, पेशंट लॉगिन आणि पेशंट प्रोफाइल इत्यादी पर्याय दिसतील. रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, व्यवस्थापन, वैद्यकीय कर्मचा-यांशी डॉक्टरांशी ऑडिओ व्हिडीओ सल्लामसलत, ई-उपचार, एसएमस ई-मेल नोटिफिकेशन, डॉक्टरांद्वारे मोफत सेवा, सर्व माहिती डॉक्टर्स, रुग्णालय यांची संख्या आदीबाबत माहिती मिळते.

तज्ज्ञ डॉक्टराकडून सल्लाएमबीबीएस, एमडी, एमएस, आयुर्वेदिक आदी तज्ज्ञ डॉक्टरच्या उपलब्धतेनुसार रुग्णांना आजारासंदर्भात हा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला मिळतो. संबंधित डॉक्टर ऑनलाइन औषधांचे प्रिस्क्रीप्शनही देतात.

५२ बीपी, शुगरचे रूग्ण घेतात अधिक सल्लाप्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात आहेत. याशिवाय उपकेंद्र, आरोग्य पथक आहेत. या भागातील ग्रामीण नागरिक प्रत्यक्ष जाऊन येथे सेवा घेतात. येथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी ई-संजीवनी योजना महत्त्वपूर्ण ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यGadchiroliगडचिरोली