लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरची तालुका मुख्यालयापासुन नऊ किलोमीटर अंतर्गत येत असलेल्या बेतकाठी व बोरी या गावात कुंभार लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार करून गावागावात व शहरातील आठवडी बाजारात ते नेऊन विकत असतात.वर्षभरातून येणाºया सणवारांना लागणाºया वस्तू व मातीची भांडी बनवण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. शेतकºयांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा सण जवळच आहे. त्याकरिता मातीचे जाते, घोडा, बैलजोडी, दिवे, लहान भांडी, माठ अशा अनेक प्रकारच्या मनोवेधक वस्तूंची कलाकुसरीसह निर्मिती सुरू आहे.आदिवासी भागात स्टील वा तत्सम धातूची भांडी वापरण्याचे प्रचलन अद्यापही फार कमी आहे. घरोघरी मातीचीच भांडी दिसून येतात. काही ठिकाणी तर नागरिक स्वत:च लागणारी भांडी बनवून वापरत असतात. या मातीच्या भांड्यातील अन्नाला अधिक चव असते असे चवीने खाणारे आवर्जून सांगत असतात.गडचिरोलीच्या डोंगराळ भागात छत्तीसगडच्या सीमेलगत कोरची तालुका ाहे. या तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी या मातीच्या भांड्याच्या कामाला सध्या लागलेले दिसत आहेत.
आदिवासी भागात मातीची खेळणी बनवण्याची जुनी पद्धत आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 10:33 IST
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरची तालुका मुख्यालयापासुन नऊ किलोमीटर अंतर्गत येत असलेल्या बेतकाठी व बोरी या गावात कुंभार लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार करून गावागावात व शहरातील आठवडी बाजारात ते नेऊन विकत असतात.वर्षभरातून येणाºया सणवारांना लागणाºया वस्तू व मातीची भांडी बनवण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. ...
आदिवासी भागात मातीची खेळणी बनवण्याची जुनी पद्धत आजही कायम
ठळक मुद्देसणासुदीला लागणाऱ्या वस्तू व दिवे बनवण्याचे काम सुरू