शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचा जिल्हाभरात घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, महाज्योती संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, ओबीसी समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष भरावा, पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, स्वतंत्र घरकूल योजना सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांकडे वेधले लक्ष : खासदार-आमदारांच्या कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात जिल्हाभरात गुरूवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकातून रॅली काढून खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक देऊन घंटानाद करण्यात आला.२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, महाज्योती संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, ओबीसी समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष भरावा, पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, स्वतंत्र घरकूल योजना सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.गडचिरोली येथील आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाराव चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, नगरसेवक रमेश भुरसे, सुरेश भांडेकर, विलास पारखी, जनार्धन ताकसांडे, रा. ना. ताजने, सुरेश लडके, दत्तात्रय खरवडे, पुरूषोत्तम झंझाळ, पंडीत पुळके, मनोज राजुरकर, शरद निंबोरकर, कमलाकर रडके, दिलीप खेवले, दादाजी चापले, पांडुरंग घोटेकर, बंडू सातपुते, सुधाकर दुधबावरे, विवेक बाबणवाडे, सतिश विधाते, अतुल बोमनवार यांनी केले.ओबीसींच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात देशभरात टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन खासदारांमार्फत केंद्र शासनाला पाठविले जाणार आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन