शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

एकता नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर

By admin | Updated: April 24, 2017 01:09 IST

गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे.

ओबीसी युवा महोत्सव : योगीता भांडेकर यांचे प्रतिपादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे. ओबीसींमध्ये एकतेची भावना नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात मागे पडत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.ओबीसी युवा महोत्सवाचे उद्घाटन गोकुलनगर येथील शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी करण्यात झाले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना योगीता भांडेकर म्हणाल्या, देशात ५२ टक्के ओबीसी असताना ओबीसीमध्ये एकतेची भावना नाही. त्यामुळे संघटन कमी पडत आहे. एकाच शाळेत एकाच बेंचवर बसणाऱ्या एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश दिल्या जाते. मात्र ओबीसी विद्यार्थ्यांना या साहित्यापासून वंचित केले जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथूनच जातीभेदाची सुरूवात होते. जि.प. अध्यक्ष या नात्याने आपण जिल्ह्यातील ओबीसींच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश शासनाकडून मिळण्याकरिता आपण प्रयत्न करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या प्रश्नांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना राज्यात झाल्यामुळे ओबीसींच्या विविध समस्या मार्गी लागणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या गावांमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे. मात्र चुकीच्या सर्वेक्षणाने संबंधित गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील ओबीसींवर अन्याय झाला आहे. या संदर्भात आमसभा व ग्रामसभांचे प्रस्ताव आमच्याकडे पोहोचले आहेत. सदर प्रस्तावाला घेऊन शासन दरबारी अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रयत्न करणार असे डॉ. होळी यांनी सांगितले. प्रा. शेषराव येलेकर म्हणाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या रेट्यामुळेच राज्यात ओबीसी मंत्रालय स्थापन झाले.मात्र या मंत्रालयाला लोकसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त निधी उपलब्ध न झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा मोठे आंदोलन करावे लागेल, असेही प्रा. येलेकर यांनी सांगितले. याप्रसंगी अरूण मुनघाटे, दादाजी चापले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक बांदूरकर, संचालन अक्षय ठाकरे यांनी केले तर आभार नयन कुनघाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला नगरसेवक रमेश भुरसे, श्याम वाढई, प्राचार्य सुरेश डोंगे, पांडुरंग घोटेकर, दादाजी चुधरी, पी. पी. म्हस्के, त्र्यंबक करोडकर, राजेंद्र उरकुडे, पी. टी. देशमुख, प्राचार्य मने, देव्हारे, हरीभाऊ बुरडकर, मत्ते, तुषार वैरागडे, राहूल भांडेकर, अतुल वाढई, शुभम बांगरे, चेतन शेंडे, शिवानी मोहुर्ले आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळच्या सुमारास कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. २४ एप्रिल रोजी सोमवारला या ठिकाणी बुध्दीबळ स्पर्धा घेतली जाणार असून सायंकाळी समुह नृत्य स्पर्धा होईल.