शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

हिंदेवाडा वनव्यवस्थापन समितीने तयार केली नर्सरी

By admin | Updated: June 19, 2014 23:50 IST

राज्य सरकारने ग्रामपंचायतींमार्फत शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत अनेक ग्रामपंचायती पावसाळ्यात वृक्षलागवड करणार आहे.

भामरागड : राज्य सरकारने ग्रामपंचायतींमार्फत शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत अनेक ग्रामपंचायती पावसाळ्यात वृक्षलागवड करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात शासनाचे चार ते पाच विभाग एकत्र येऊन वृक्षलागवड कार्यक्रम राबवित आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर रोप लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक वनव्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घेत नर्सरी तयार केली आहे. भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा वनव्यवस्थापन समितीने भामरागड येथील वनविभागाच्या विश्रामगृहातच नर्सरी तयार केली आहे. या नर्सरीमध्ये ३३ ते ३५ हजार रोप ठेवण्यात आले आहे. यामध्ये बेहडा, अमलतास, कवठ, बेल, गुलमोहरा, आगरेचिंच, शिवण, काशिद आदी वृक्षाचे रोप आहेत. या नर्सरीतील रोपांना उन्हाळ्याच्या दिवसातही नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा, म्हणून पामुल गौतम नदीपात्रातून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात पाण्याची टाकीही नर्सरीसाठी तयार करण्यात आली आहे. या नर्सरीची देखभाल करण्याचे काम देवाजी बिचंगा आत्राम यांच्याकडे देण्यात आले आहे. ते व त्यांच्या पत्नी दररोज या नर्सरीतील वृक्षाची निगा राखण्याचे काम करीत आहे. याशिवाय वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात लावण्यात आलेल्या विविध वृक्षांचीही देखभाल ते करीत आहे. हे रोप पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपणासाठी दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली. (तालुका प्रतिनिधी)