शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

रेती घाटांची संख्या घटली

By admin | Updated: November 3, 2016 02:29 IST

रेतीघाटाच्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेतून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल

महसुलावर परिणाम : ४० रेतीघाट संरक्षित जंगलात समाविष्ट गडचिरोली : रेतीघाटाच्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेतून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल दरवर्षी मिळत असतो. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ४० रेतीघाट संरक्षित जंगलात समाविष्ट झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात रेतीघाटाची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम शासनाच्या महसुलावर होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात रेतीघाटाची संख्या जवळपास १०० पेक्षा अधिक आहे. यंदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन २०१६-१७ वर्षासाठी १२० रेतीघाट प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र रेतीचे उत्खनन व वाहतुकीसाठी ६२ रेतीघाटाला मंजुरी प्रदान करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने पहिल्या टप्प्यात २८ व दुसऱ्या टप्प्यात १८ अशा एकूण ३३ रेतीघाटांची विक्री संबंधित कंत्राटदारांना आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत करण्यात आली. या रेतीघाटापासून जवळपास ३४ कोटींचा महसूल शासनाला मिळाला आहे. मात्र प्रस्तावित करण्यात आलेल्यांपैकी ४० रेतीघाटाला मंजुरी देण्यात न आल्याने शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल यंदा बुडणार आहे. वनकायद्याच्या जाचक अटीमुळे आधीच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. परिणामी सिंचन सुविधेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. वनकायद्यातील जाचक अटी शिथील करण्यात याव्या, अशी मागणी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांसह शेतकऱ्यांनी शासनकर्त्यांकडे वारंवार केली आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाने वनकायद्यातील जाचक अटी शिथील केल्या नाही. वनकायद्यातील जाचक अटींचा सामना रेतीघाटाच्या बाबतही करावा लागत आहे. वन विभागाच्या जागेवर असलेल्या रेतीघाटातून रेतीचे उत्खनन व वाहतूक करण्यास वन विभागाने मज्जाव केला आहे. सदर जागा वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने महसूल विभागाला संबंधित रेतीघाटाला परवानगी देता येत नाही. संरक्षित जंगलात जवळपास ४० रेतीघाट गेल्यामुळे या रेतीघाटाचा लिलाव जिल्हा प्रशासनाला करता आला नाही. संरक्षित जंगलात गेलेल्या रेती घाटांमध्ये कुरखेडा तालुक्यातील चार, आरमोरी तालुक्यातील सहा, सिरोंचा तालुक्यात चार व अहेरी तालुक्यातील दोन रेती घाटांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील वघाळा येथील रेतीघाटाला यंदा मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे रेती घाटापासून मिळणारा एक कोटीचा महसूल बुडला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) तीन तालुक्यांत रेतीघाटच उरले नाहीत ४मुलचेरा, एटापल्ली, भामरागड या तीन तालुक्यात नदी, नाल्यांची संख्या मोठी असल्याने रेतीघाट मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या तिन्ही तालुक्यातील रेतीघाट संरक्षित जंगलात समाविष्ट झाल्याने येथील रेती घाटांना रेती उत्खनन व वाहतुकीसाठी मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे या तीन तालुक्यातील रेतीघाट लिलाव प्रक्रियेत ठेवण्यात आले नाही. या तीन तालुक्यात एकही मान्यताप्राप्त रेतीघाट नाही. त्यामुळे सन २०१६-१७ या वर्षात तालुक्यातील रेतीघाटातून रेतीचे उत्खनन होणार नाही. या तीन तालुक्यातील नागरिकांना रेतीसाठी इतर तालुक्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.