शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप रूग्णांची संख्या २५ हजारांहून घटली

By admin | Updated: April 25, 2017 00:36 IST

वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात काही वर्षापूर्वी हिवतापाचे प्रचंड थैमान होते. २०१५ या वर्षात जिल्हाभर हिवतापाची साथ आली होती.

आरोग्य यंत्रणेला यश : २०१६ मध्ये तिघांचा तर २०१७ मध्ये एकाचा मृत्यूदिलीप दहेलकर गडचिरोलीवनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात काही वर्षापूर्वी हिवतापाचे प्रचंड थैमान होते. २०१५ या वर्षात जिल्हाभर हिवतापाची साथ आली होती. मात्र त्यानंतर आरोग्य यंत्रणा व जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने प्रभावी विविध उपक्रम व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याने सन २०१५ च्या तुलनेत सन २०१६ व २०१७ या चालू वर्षात हिवताप पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या सरासरी २५ हजारहून कमी झाली आहे. सन २०१४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात हिवताप पॉझिटीव्ह असलेल्या १८ रूग्णांचा मृत्यू झाला. तर २०१६ मध्ये तीन व २०१७ मध्ये मार्च पर्यंत केवळ एका हिवताप रूग्णाचा मृत्यू झाला. हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या, जनमानसाचे आर्थिक नुकसान व देशाच्या आरोग्यामध्ये होणारी पिछेहाट या जलंत बाबीकडे राज्याच्या धोरणवादीचे, सत्ताधाऱ्यांचे तसेच सर्व घटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिवतापाची रूग्णसंख्या बळावली होती. आरोग्य विभागातर्फे विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात आल्याने हिवताप रूग्णसंख्या व हिवताप रूग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षनिय घट झाली. सन २०१५ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून एकूण ७ लाख ४७ हजार ४११ लोकांचे हिवताप तपासणीसाठी रक्त नमुने घेण्यात आले. तपासणी अंती एकूण ३४ हजार २०६ रूग्ण हिवताप पॉझिटीव्ह आढळून आले. यामध्ये पीव्ही प्रकाराचे ६ हजार ९७८ व पीएफ प्रकाराचे २७ हजार २२८ रूग्णांचा समावेश आहे. सन २०१५ मध्ये हिवतापाने ११ रूग्णांचा मृत्यू झाला. हिवतापाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सन २०१६ पासून विशेष कृती योजनेंतर्गत अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे हिवताप सर्वेक्षण योजना आखण्यात आली. दोन फेऱ्या प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. तब्बल दोन लाख कीटकनाशक भारीत मच्छरदान्यांचे वाटप हिवताप प्रभावीत गावांमध्ये वाटप करण्यात आले. त्यामुळे सन २०१६ मध्ये रूग्णसंख्या कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले. सन २०१६ मध्ये ९ लाख १४ हजार ६४८ लोकांपैकी तपासणीअंती एकूण ९ हजार १६३ हिवताप रूग्णसंख्या आढळून आली. यामध्ये ६ हजार ३०१ इतक्या पीएफ रूग्णांचा समावेश आहे. हिवताप नियंत्रणासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहे.पीएफ प्रकार गंभीरहिवताप रूग्णांमध्ये पीव्ही व पीएफ हे दोन प्रकार आढळून येतात. पीव्ही हा नार्मल स्वरूपाचा हिवताप असून पीएफ हा प्रकार गंभीर आहे. प्रभावी व लागलीच उपचार न मिळाल्यास पीएफ प्रकारातील हिवताप रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.